शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

आॅस्ट्रेलिया बाद फेरीत

By admin | Updated: March 9, 2015 09:33 IST

ग्लेन मॅक्सवेलचे आक्रमक शतक व कुमार संगकाराचे विक्रमी शतक याचा साक्षीदार ठरलेल्या मोठ्या धावसंख्येच्या सामन्यात अखेर यजमान आॅस्ट्रेलियाने रविवारी श्रीलंकेचा

सिडनी : ग्लेन मॅक्सवेलचे आक्रमक शतक व कुमार संगकाराचे विक्रमी शतक याचा साक्षीदार ठरलेल्या मोठ्या धावसंख्येच्या सामन्यात अखेर यजमान आॅस्ट्रेलियाने रविवारी श्रीलंकेचा ६४ धावांनी पराभव करीत आयसीसी क्रिकेट विश्वकप स्पर्धेत बाद फेरीतील प्रवेश निश्चित केला. मॅक्सवेलने विश्वकप स्पर्धेतील दुसरे सर्वात वेगवान शतक झळकावले. कारकीर्दीत प्रथमच शतक झळकावताना मॅक्सवेलने ५३ चेंडूंना सामोरे जात १०२ धावांची खेळी केली. त्यात १० चौकार व ४ षटकारांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त स्टिव्हन स्मिथ (७२), कर्णधार मायकल क्लार्क (६८) आणि शेन वॉटसन (६७) यांनी अर्धशतके झळकावली. आॅस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी स्वीकारताना ९ बाद ३७६ धावांची दमदार मजल मारली. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेतर्फे कुमार संगकाराने (१०४) या स्पर्धेत तिसऱ्यांदा शतकी खेळी केली. यापूर्वी त्याने नाबाद १०५ व नाबाद ११७ धावांच्या खेळी केलेल्या आहेत. तिलकरत्ने दिलशान (६२) व दिनेश चंदीमल (रिटायर्ड हर्ट ५२) यांनी अर्धशतके झळकावण्याची कामगिरी केली. श्रीलंका संघाने एकवेळ आॅस्ट्रेलियन तंबूत चिंतेचे वातावरण निर्माण केले होते. पण स्नायूच्या दुखापतीमुळे चंदीमलला मैदान सोडावे लागल्यानंतर चित्र बदलले. श्रीलंका संघाचा डाव ४६.२ षटकांत ३१२ धावांत संपुष्टात आला. आॅस्ट्रेलियाचा पाच सामन्यांतील हा तिसरा विजय आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे एक सामना रद्द झाला. आॅस्ट्रेलियाच्या खात्यावर ७ गुणांची नोंद असून ‘अ’ गटात हा संघ न्यूझीलंडनंतर दुसऱ्या स्थानावर दाखल झाला आहे. पाच सामने खेळणाऱ्या श्रीलंका संघाचा हा दुसरा पराभव आहे. श्रीलंका संघाच्या खात्यावर ६ गुणांची नोंद असून, त्यांची तिसऱ्या स्थानी घसरण झाली.लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंका संघाची सुरुवात निराशाजनक झाली. लाहिरू थिरिमाने (१) दुसऱ्याच षटकात माघारी परतला. त्यानंतर संगकारा व दिलशान यांनी दुसऱ्या विकेटसाठी जवळजवळ २० षटकांत १३० धावांची भागीदारी केली. क्लार्कने दिलशानचा सोपा झेल सोडला. त्याला लाभ घेत दिलशानने ६० चेंडूमध्ये ६२ धावांची खेळी केली. त्यात ८ चौकारांचा समावेश आहे. दरम्यान, संगकाराने आज वन-डे क्रिकेट कारकीर्दीत १४ हजार धावांचा टप्पा ओलांडला. भारताच्या सचिन तेंडुलकरनंतर अशी कामगिरी करणारा तो जागतिक क्रिकेटमधील दुसरा फलंदाज ठरला आहे. त्यानंतर संगकाराने वैयक्तिक शतक साकारले. विश्वकप स्पर्धेत सलग तीन शतके ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. फॉकनरने संगकाराचा अडथळा दूर केला. संगकाराने १०७ चेंडूंना सामोरे जाताना ११ चौकार ठोकले. फॉकनरने त्यापूर्वी दिलशानला तंबूचा मार्ग दाखवीत ही भागीदारी संपुष्टात आणली होती. अनुभवी माहेला जयवर्धने (१९) चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. संगकारा व जयवर्धने हे दोन्ही फलंदाज पॉवरप्लेमध्येबाद झाले. लंकेने २९ व्या षटकात पॉवर प्ले घेतला होता. त्यानंतर युवा चंदीमलने २२ चेंडूंमध्ये अर्धशतकी खेळी करीत श्रीलंकेच्या आशा कायम राखल्या. श्रीलंकेतर्फे विश्वकप स्पर्धेत हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. वन-डेमध्ये श्रीलंकेतर्फे सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम सनथ जयसूर्याच्या (१७ चेंडू) नावावर आहे. चंदीमल वैयक्तिक ५२ धावा फटकावल्यानंतर रिटायर्ड हर्ट झाल्यामुळे सामन्याचे चित्र बदलले. चंदीलमला ४२ व्या षटकात मैदान सोडावे लागले. त्याच षटकात वॉटसनने कर्णधार मॅथ्यूजला (३१ चेंडू, ३५ धावा) माघारी परतवले. त्यामुळे आॅस्ट्रेलियाचा विजय निश्चित झाला. त्याआधी मॅक्सवेलने केवळ ५१ चेंडूंमध्ये शतक साकारले. आयर्लंडच्या केव्हिन ओब्रायनचा (५० चेंडू) विश्वकप स्पर्धेतील सर्वात वेगवान शतकाच्या विक्रमाची बरोबरी करण्यात तो अपयशी ठरला. गेल्या लढतीत न्यूझीलंडविरुद्ध एक विकेटने पराभव स्वीकारणाऱ्या आॅस्ट्रेलिया संघाची सुरुवात आज निराशाजनक झाली. डेव्हिड वॉर्नर (९) झटपट माघारी परतला असला तरी, आॅस्ट्रेलियन फलंदाजांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. क्लार्क व स्मिथ यांनी तिसऱ्या विकेटसाठी १३४ धावांची भागीदारी करीत, आॅस्ट्रेलियाला मोठ्या धावसंख्येची मजबूत पायाभरणी करून दिली. (वृत्तसंस्था)