शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आॅस्ट्रेलियाने मालिकेवर छाप सोडली

By admin | Updated: March 6, 2017 00:06 IST

सध्या खेळल्या जात असलेल्या मालिकेमध्ये जास्तीत जास्त सत्रांमध्ये आॅस्ट्रेलिया संघाने वर्चस्व गाजवले.

-रवी शास्त्री लिहितो...सध्या खेळल्या जात असलेल्या मालिकेमध्ये जास्तीत जास्त सत्रांमध्ये आॅस्ट्रेलिया संघाने वर्चस्व गाजवले. बेंगळुरुतील दुसरा दिवस काही वेगळा नव्हता. ते निखाऱ्यावर चालण्यासाठी सज्ज होते. येथील परिस्थितीची त्यांना कल्पना नव्हती. त्यामुळे त्यांनी संथगतीने धावा केल्या. नैसर्गिक आक्रमक शैलीला मुरड घालत त्यांनी बचावात्मक पवित्रा स्वीकारला. कसोटी मालिकेच्या निर्णायक दिवशी त्यांनी वर्चस्व गाजवले. भारतीय संघ निश्चितच दडपणाखाली आहे. अनेकदा क्षेत्ररक्षक चुका करीत असून डीआरएस घेण्यात डोके काम करीत नसल्याचे चित्र आहे. फलंदाजांच्या आजूबाजूला क्षेत्ररक्षक थकलेले दिसत आहेत. गोलंदाजांची कामगिरी मात्र प्रभावित करणारी होती. अडचणीच्या परिस्थितीत त्यांनी खांदे न झुकवता आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये उपस्थित कुठल्याही निष्पक्ष पर्यवेक्षकाला याची नोंद घेता आली असती. उमेश यादव व ईशांत शर्माची जोडी शानदार होती. आॅस्ट्रेलियाचा प्रत्येक फलंदाज ‘अभेद्य भिंत’ म्हणूनच मैदानात दाखल होत होता. आॅस्ट्रेलियाची फलंदाजी केवळ वॉर्नर किंवा स्मिथवर अवलंबून नसल्याचे स्पष्ट झाले. प्रत्येक फलंदाज प्रतिस्पर्धी संघाच्या रणनीतीला उत्तर देण्यास सज्ज असल्याचे दिसून आले. त्यांनी भारतीय संघाला चोख उत्तर देण्याचा निर्धार केला आहे. उंच चणीचा युवा सलामीवीर मॅट रेनशॉने सर्वांना प्रभावित केले. त्याचा आपल्या फुटवर्कवर विश्वास आहे. आव्हानात्मक परिस्थिती असली तरी त्याचा लवलेशही त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. त्याने महत्त्वाची खेळी केली. त्यानंतर शॉन मार्श आणि मॅथ्यू वेड यांनी लढवय्या खेळी करीत सामन्याला निर्णायक वळणावर पोहचविले. सध्याची स्थिती बघता भारताच्या आघाडीच्या फळीला चांगली फलंदाजी करावी लागेल. आॅस्ट्रेलियाचा पहिला डाव अद्याप संपलेला नाही. झपाट्याने रंग बदलत असलेल्या खेळपट्टीवर प्रत्येक धाव मोलाची आहे. (टीसीएम)