शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

आॅस्ट्रेलियाला इंग्लंड व ‘पावसाचे’आव्हान

By admin | Updated: June 10, 2017 04:55 IST

मागच्या दोन्ही सामन्यात पावसाचा फटका बसलेल्या आॅस्ट्रेलिया संघाला आज शनिवारी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ‘करा किंवा मरा’ या

बर्मिंघम : मागच्या दोन्ही सामन्यात पावसाचा फटका बसलेल्या आॅस्ट्रेलिया संघाला आज शनिवारी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ‘करा किंवा मरा’ या लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी इंग्लंडसह पुन्हा एकदा पावसाच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे.इंग्लंडने आधीच उपांत्य फेरी गाठली. अशावेळी दडपण आॅस्ट्रेलियावर असेल. न्यूझीलंड आणि बांगला देशविरुद्धचे सामने पावसात धुतले गेल्याने आॅस्ट्रेलियाला केवळ दोन गुणांवर समाधान मानावे लागले. एकही सामना पूर्ण झाला नसल्याने उपांत्य फेरीच्या आशा अधांतरी आहेत. एजबस्टनमध्ये खेळविण्यात आलेले तिन्ही सामने पावसामुळे प्रभावित झाले. आजही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान चांगले असले तरी आॅस्ट्रेलियापुढे इंग्लंडचे बलाढ्य आव्हान राहील. आॅस्ट्रेलियाच्या फलंदाजांना क्रिझवर स्थिरावण्याची पुरेशी संधी अद्यापतरी मिळालेली नाही. आॅस्ट्रेलियन फलंदाजांना इंग्लंडचा मारा खेळणे वाटते तितके सोपे जाणार नाही. डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅरोन फिंच आणि स्टीव्हन स्मिथ यांचा अपवाद वगळता मधल्या फळीतील फलंदाजांना तर सरावाची देखील पुरेशी संधी लाभलेली नाही. गोलंदाजीत या संघाने बांगलादेशला १८२ धावांत बाद केले होते. त्या सामन्यात मिशेल स्टार्कने चार बळी घेतले तसेच जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांची त्याला चांगली साथ लाभली होती. लेगस्पिनर अ‍ॅडम झम्पा याने चार षटकांच्या गोलंदाजीत दोन गडी बाद केले. इंग्लंडने दोन्ही सामन्यात ३०० वर धावा फळ्यावर लावल्याने त्यांच्या फलंदाजांना रोखण्याचे उपाय आॅस्ट्रेलियाला शोधावे लागणार आहेत. इंग्लंडचा सलामीवीर अ‍ॅलेक्स हेल्सने न्यूझीलंडविरुद्ध स्पर्धेत दुसरे अर्धशतक ठोकले तर ज्यो रुटने बांगलादेश्विरुद्ध नाबाद १३३ धावांची खेळी केली. जेसन राय याने मात्र एकही मोठी खेळी केलेली नाही. आॅस्ट्रेलियाचा माजी फलंदाज हसीच्या मते आॅस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंड विजयाचा दावेदार म्हणून सुरुवात करेल. हसी पुढे म्हणाला,‘दोन्ही संघांमधील कडवी स्पर्धा जुनीच आहे. मोठ्या सामन्यात इंग्लंड आॅस्ट्रेलियावर नेहमी वरचढ ठरतो. या सामन्यातही आॅस्ट्रेलिया बाहेरचा रस्ता दाखविण्यात इंग्लंड कसर शिल्लक राखणार नाही, असा मला विश्वास आहे.’(वृत्तसंस्था)उभय संघ यातून निवडणार-आॅस्ट्रेलिया : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅरोन स्मिथ, पॅट कमिन्स, जॉन हेस्टिंग्स, जोश हेजलवूड, ट्रेव्हिस हेड, मोझेस हेन्रिक्स, ख्रिस लिन, ग्लेन मॅक्सवेल, जेम्स पॅटिनसन, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, मॅथ्यू वेड, अ‍ॅडम झम्पा.इंग्लंड : इयोन मोर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेयरस्टॉ, जॅक बॉल, सॅम बिलिंग्स, अ‍ॅलेक्स हेल्स, जोस बटलर, लियाम प्लंकेट, आदील राशिद, ज्यो रुट, जेसन राय, बेन स्टोक्स, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वूड, स्टीवन फिन.