शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
5
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
6
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
7
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
8
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
9
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
10
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
11
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
12
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
13
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
14
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
15
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
16
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
17
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
18
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
19
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
20
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
Daily Top 2Weekly Top 5

ऑसी

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

फिंच व मार्शची चमकदार कामगिरी, फिनची हॅट्ट्रिक व्यर्थ

फिंच व मार्शची चमकदार कामगिरी, फिनची हॅट्ट्रिक व्यर्थ
ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला लोळवले
मेलबोर्न : सलामीवीर ॲरोन फिंचने स्पर्धेतील पहिले शतक झळकावल्यानंतर मिशेल मार्शच्या (५ बळी) अचूक मार्‍याच्या जोरावर यजमान ऑस्ट्रेलियाने शनिवारी विश्वकप स्पर्धेत आपल्या पहिल्या लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी इंग्लंडचा १११ धावांनी धुव्वा उडवला. इंग्लंडतर्फे हॅट्ट्रिक नोंदविणारा स्टीव्हन फिन व नाबाद ९८ धावांची खेळी करणारा जेम्स टेलर यांचे प्रयत्न अखेर अपुरेच पडले.
फिंच (१३५) आणि ग्लेन मॅक्सवेल (६६ धावा, ४० चेंडू) यांच्या चमकदार फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ९ बाद ३४२ धावांची दमदार मजल मारली. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टीव्हन फिनने अखेरच्या ३ चेंडूंवर ३ बळी घेत २०१५च्या विश्वकप स्पर्धेत पहिली हॅट्ट्रिक नोंदविली; पण तोपर्यंत ऑस्ट्रेलियाने विशाल धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात खेळताना इंग्लंडचा डाव ४१.५ षटकांत २३१ धावांत संपुष्टात आला. जेम्स टेलरने नाबाद ९८ धावांची खेळी केली; पण त्याला दुसर्‍या टोकाकडून अपेक्षित साथ लाभली नाही.
जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणार्‍या ऑस्ट्रेलियातर्फे मार्शने ९ षटकांत ३३ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले, तर मिशेल स्टार्क व मिशेल जॉन्सन यांनी प्रत्येकी २ फलंदाजांना माघारी परतवले. लक्ष्याचा पाठलाग करताना एक वेळ इंग्लंडची ६ बाद ९२ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर टेलर व ख्रिस व्होक्स यांनी सातव्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी करून डाव सावरला; पण आवश्यक धावगती राखण्यात त्यांना अपयश आले.
त्याआधी इंग्लंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ऑस्ट्रेलियातर्फे फिंचने १२८ चेंडूंना सामोरे जाताना १३५ धावांची खेळी केली. त्यानंतर मॅक्सवेलच्या आक्रमक खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला मेलबोर्न क्रिकेट मैदानावर विशाल धावसंख्या उभारण्यात यश आले.
०००