शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

धावपटू तीन पदकांना मुकले

By admin | Updated: March 1, 2016 03:03 IST

सांघिक गटात आवश्यक असलेले खेळाडू न उतरविल्याचा फटका भारतीय धावपटूंना बसला आहे. बहरिनमध्ये झालेल्या आशियाई क्रॉसकंट्रीत भारतीय अ‍ॅथलेटिक्स

नवी दिल्ली : सांघिक गटात आवश्यक असलेले खेळाडू न उतरविल्याचा फटका भारतीय धावपटूंना बसला आहे. बहरिनमध्ये झालेल्या आशियाई क्रॉसकंट्रीत भारतीय अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनने (एएफआय) मोजके खेळाडू पाठविल्यामुळे संघाला तीन कांस्यपदकांपासून वंचित राहावे लागले.एएफआयने चॅम्पियनशिपमध्ये सिनियर पुरुष व महिला तसेच ज्युनियर पुरुष व महिला गटात प्रत्येकी ३ खेळाडू पाठविले होते. वरिष्ठ पुरुष वगळता अन्य तीन गटांत भारतीय खेळाडूंना किमान तीन कांस्यपदकांची संधी होती, कारण सर्वाधिक गुण भारतीयांनी मिळविले होते. मनामा येथे झालेल्या या स्पर्धेत भारताची पदकांची झोळी रिकामीच राहिली. प्रत्येक देशाला एका गटासाठी किमान चार खेळाडू पाठविता येतात. पहिल्या तीन स्थानांवर राहणाऱ्या खेळाडूंना गुण दिले जातात. अव्वल स्थानासाठी एक, दुसऱ्या स्थानासाठी दोन व तिसऱ्या स्थानासाठी तीन गुण असतात. सर्वांत कमी गुण मिळविणाऱ्या संघाला सुवर्णपदक दिले जाते.याबाबत विचारणा करताच एएफआय अध्यक्ष आदील सुमारीवाला यांनी मुख्य संचालन अधिकारी मनीष कुमार यांच्यासोबत बैठक सुरू असल्याचे सांगितले. निकालावरून भारताला किमान तीन पदके मिळायला हवी होती, इतकेच ते म्हणाले. पदके का मिळाली नाहीत, याचे उत्तर नंतर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सिनियर महिला गटात बहरिन अव्वल स्थानावर राहिला. भारताची संजीवनी जाधव, स्वाती गाढवे आणि मनीषा साळुंखे सातव्या, दहाव्या व १७व्या स्थानी आल्या. भारतीय संघाचे ३४ गुण झाले. बहरिन व चीनपाठोपाठ भारत तिसऱ्या स्थानावर आल्याने एक कांस्य मिळायला हवे होते. ज्युनियर पुरुष गटात बहरिन सुवर्णाचा मानकरी ठरला, तर जपानला रौप्य मिळाले. भारताने किसन तडवी, अन्सार इमान दर्गीवाले व अनिल यादव आठव्या, दहाव्या व ११व्या स्थानावर आले. भारताचे ४९ गुण झाल्याने कांस्य घोषित करण्यात आले होते. ज्युनियर महिला गटातही बहरिन ८ गुणांसह अव्वल, तर जपान दुसऱ्या स्थानावर राहिला. भारतीय धावपटू आरती दत्तारे, नंदिनी गुप्ता आणि सुधा पाल या ११व्या, १२व्या व १६व्या स्थानावर आल्या. भारताचे ३९ गुण झाले होते; पण ४ खेळाडूंसह उतरलेल्या जॉर्डनला ५० गुणांची कमाई केल्यानंतरही कांस्यपदक देण्यात आले. (वृत्तसंस्था)