शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अश्विनची भेदक गोंलदाजी, पावरप्लेच्या ६ षटकात लंकेचा अर्धा संघ बाद

By admin | Updated: February 14, 2016 20:12 IST

अश्विनच्या भेदक गोलंदाजीमुळे लंकेचा अर्धा संघ पावर प्लेच्या ६ षटकात तंबूत परतला आहे. अश्विनने आपल्या ३ षटकात ५ धावा देत ४ गडी बाद केले.

ऑनलाइन लोकमत
विशाखापट्टणम, दि. १४ : अश्विनच्या भेदक गोलंदाजीमुळे लंकेचा अर्धा संघ पावर प्लेच्या ६ षटकात तंबूत परतला आहे. अश्विनने आपल्या ३ षटकात ५ धावा देत ४ गडी बाद केले. तर एका फलंदाजाला नेहराने तंबूचा रस्ता दाखवला. आर अश्विनने लंकेला आपल्या पहिल्या २ षटकात ३ धक्के देत श्रीलंकेच्या भक्कम फलंदाजीला खिंडार पाडले. अश्विनने आपल्या पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर निरोशन डिकवेला २ धावांवर आणि सहाव्या चेंडूवर धोकदायक दिलशानला १ धावांवर माघारी झाडले. तर आपल्या वैयकतिक दुसऱ्या आणि संघाच्या तिसऱ्या षटकात कर्णघार चंडिमलला ८ धावावर बाद केले. अश्विनने भेदक गोंलदाजी करत श्रीलंकेच्या भक्कम फलंदाजीला खिंडार पाडले. 
शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा लंकेने ६ षटकात ५ गड्याच्या मोबदल्यात २९ धावा केल्या होत्या. 

 तिसऱ्या व निर्णायक टी २० सामन्यात कर्णधार धोणीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधाराचा हा निर्णय गोलंदाजानी सारत ठरवला.  दुसऱ्या सामन्यात एकतर्फी विजय नोंदवित आत्मविश्वास बळावलेला भारतीय संघ आज तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात श्रीलंकेवर पुन्हा एकदा विजय मिळविण्यासह मालिका जिंकण्याच्या इराद्याने उतरलेला आहे. भारतीय संघात कोणताही बदल केला नाही तर श्रीलंकेच्या संघात एकमेव बदल केला आहे. अनुभवी दिलहरा फर्नांडोला संघात स्थान दिले आहे. भारताने जर हा सामना गमानला तर भारतास आपले ICC चे टी २० मधील प्रथम स्थानापासून हात धुवावे लागलील.

पुण्यातील पहिल्या सामन्यात भारताला दारुण पराभव पत्करावा लागला होता. पण रांचीत परतफेड करीत ६९ धावांनी सामना जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणण्यात यश आले. पुण्याच्या गवताळ खेळपट्टीने भारतीय फलंदाजांचे अवसान गळाले. रांचीतील मंद खेळपट्टीवर मात्र भारतीय खेळाडूंना उत्तम ताळमेळ साधण्यात यश आले होते.
भारत :
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, युवराजसिंग, रवींद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह, आशिष नेहरा, हार्दिक पंड्या.
श्रीलंका :
दिनेश चंडीमल (कर्णधार), दुष्मंता चामिरा, निरोशन डिकवेला, तिलकरत्ने दिलशान, दिलहारा फर्नांडो, असेला गुणरत्ने, तिसारा परेरा, सेकुगे प्रसन्ना, सचित्र सेनानायके, दासुन सनाका, मिलिंदा सिरिवर्धना.