इराणविरुद्ध अर्जेंटिनाचे पारडे जड
By admin | Updated: June 20, 2014 21:24 IST
पॉइंटर
इराणविरुद्ध अर्जेंटिनाचे पारडे जड
पॉइंटरइराणविरुद्ध विजय मिळवल्यास अर्जेंटिनाचे बाद फेरीतील प्रवेश होणार सुकरइराणला वर्ल्डकपमध्ये एकमेव विजय १९९८ मध्ये अमेरिकेविरुद्ध मिळाला होता.बलाढ्य नायजेरियाला रोखत विश्वचषकाच्या १९७८ नंतर वर्ल्डकपमध्ये इराणने नोंदवला होता सहावा गुणबेलो होरिजोंटे : विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाणारा अर्जेंटिना संघ फुटबॉल विश्वचषकात शनिवारी जेव्हा इराणविरुद्ध एफ गटाच्या लढतीत उतरेल तेव्हा त्यांचे लक्ष्य विजयाबरोबरच बाद फेरीतील आपले स्थान पक्के करण्याचे असेल.अर्जेंटिनाने त्यांच्या पहिल्या सामन्यात बोस्निया-हर्जेगोविनाला २-१ असे पराभूत केले होते. संघाने सामन्याच्या सुरुवातीलाच डिफेन्समध्ये पाच खेळाडू उतरवले होते आणि पुन्हा ४-३-३ अशा व्यूहरचनेने ते दिसले होते. त्यामुळे स्टार स्ट्रायकर मेस्सीला वर्ल्डकपमधील त्याचा पहिला गोल करण्याची संधी मिळाली होती.इराणचे प्रशिक्षक कालार्ेस क्विरोज यांच्यामते अर्जेंटिनाला पराभूत करण्यासाठी त्यांच्या संघाला चमत्काराची आवश्यकता असेल. तथापि, इराण अर्जेंटिनाविरुद्ध आपल्या इतिहासापासून प्रेरणा घेऊ शकतो. या दोन संघांत याआधी १९७७ मध्ये एकमेव लढत झाली होती. त्या वेळेस नियमित वेळेत दोन्ही संघांची स्थिती १-१ अशी होती; परंतु इराणाला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव पत्करावा लागला होता.रँकिंगमध्ये आशियाचा नंबर वन संघ इराणने आपल्या गत सामन्यात बलाढ्य नायजेरियाला गोलरहित ड्रावर रोखले होते आणि वर्ल्डकपच्या इतिहासात संघाने प्रतिस्पर्ध्याला गोल करू न देण्याची ही पहिलीच वेळ होती. तसेच इराणने १९७८ नंतर चार वर्ल्डकपमध्ये आपला सहावा गुण नोंदवला.