शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

अर्जेंटिना अंतिम फेरीत

By admin | Updated: July 2, 2015 03:06 IST

स्टार स्ट्रायकर लिओनेल मेस्सी याच्या शानदार खेळाच्या जोरावर बलाढ्य व विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या अर्जेंटिनाने उपांत्य सामन्यात पॅराग्वे संघाला ६-१ असे लोळवून

कॉन्सेप्सिआॅन : स्टार स्ट्रायकर लिओनेल मेस्सी याच्या शानदार खेळाच्या जोरावर बलाढ्य व विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या अर्जेंटिनाने उपांत्य सामन्यात पॅराग्वे संघाला ६-१ असे लोळवून कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. देशाकडून खेळताना आजपर्यंत एकही स्पर्धा न जिंकलेल्या मेस्सीने या सामन्यात कोणतीही कसर न सोडता आपल्या लौकिकानुसार खेळ करीत संपूर्ण सामन्यावर वर्चस्व राखले. त्याचवेळी मोक्याच्यावेळी पूर्णपणे फॉर्ममध्ये येताना त्याने विजेतेपदासाठी आधीच अंतिम फेरीत पोहोचलेल्या चिलीला धोक्याचा इशारादेखील दिला आहे. शनिवारी कोपा अमेरिका स्पर्धेच्या विजेतेपदासाठी अर्जेंटिना व यजमान चिली यांच्यामध्ये अटीतटीची लढत रंगेल.दरम्यान, उपांत्य सामन्यात पॅराग्वेविरुध्द मेस्सीने एकही गोल नोंदवला नाही. मात्र, संघाच्या वतीने नोंदवलेल्या सहाही गोलमध्ये त्याची भूमिका निर्णायक ठरली. मार्कोस रोजो आणि जेविअर पास्टोरे यांनी पहिल्याच सत्रात वेगवान गोल करताना अर्जेंटिनाला मध्यंतराला २-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर लुकास बैराइस याने महत्त्वपूर्ण गोल करताना पॅराग्वेची आघाडी १-२ अशी कमी केली. यावेळी पॅराग्वे पुनरागमन करणार असे दिसत होते. मात्र, अर्जेंटिनाच्या आक्रमकांनी तुफान हल्ला करताना पॅराग्वेच्या आव्हानातली हवाच काढली. या वेळी मेस्सीने जबरदस्त चाल रचताना प्रत्येक गोलमध्ये निर्णायक कामगिरी केली. मेस्सीने निर्माण केलेल्या संधीवर अग्नेल डी मारियाने दोन, तर सर्जिओ अग्युरो आणि गोंझालो हिग्युएन यांनी प्रत्येकी एक गोल केले.