शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

लोढा समितीचा अहवाल लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2016 03:31 IST

क्रिकेटमधील भ्रष्टाचार संपविण्यासाठी आणि प्रशासकीय सुधारणांसदर्भात लोढा समितीने आपल्या अहवालात केलेल्या सूचना योग्य, न्यायसंगत आणि बोध घेण्यासारख्या असल्याचे संबोधून

नवी दिल्ली : क्रिकेटमधील भ्रष्टाचार संपविण्यासाठी आणि प्रशासकीय सुधारणांसदर्भात लोढा समितीने आपल्या अहवालात केलेल्या सूचना योग्य, न्यायसंगत आणि बोध घेण्यासारख्या असल्याचे संबोधून भारतीय क्रिकेट बोर्डाने त्या आचरणात आणाव्यात अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.न्या. तिरथसिंग ठाकूर आणि न्या. फकीर मोहम्मद इब्राहिम कलिफुल्ला यांच्या पीठाने स्पष्टपणे सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने माजी मुख्य न्यायमूर्ती आर.एन.लोढा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या समितीने सुचविलेल्या शिफारशींची तंतोतंत अंमलबजावणी व्हावी, असे न्यायालयाला वाटते.अहवालाचा सन्मान करण्यात यावा, कारण हा अहवाल न्यायपालिकेच्या सर्वाधिक प्रतिष्ठित न्यायमूर्र्तींच्या मार्गदर्शनात तयार करण्यात आला आहे. बोर्डाने शिफारशी लागू कराव्यात आणि संभाव्य समस्यांपासून सावध राहावे, असे न्यायालयाने पुढे म्हटले आहे. कोर्टाने अहवालातील शिफारशींच्या अंमलबाजवणीसंदर्भात आपले म्हणणे मांडण्यासाठी बीसीसीआयला चार आठवड्यांचा वेळ दिला आहे. पुढील सुनावणी ३ मार्च रोजी होईल. बीसीसीआयचे वकील शेखर नाफडे यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, बोर्डाला आपल्या ३० सदस्यांचे मत जाणून घ्यायचे आहे. शिवाय अहवालाची संपूर्ण अंमलबजावणी झाल्यास अनेक गुंतागुंतीचा सामना करावा लागेल. लोढा समितीचा अहवाल बोर्डाने सदस्यांना पाठविला आहे. यावर कायदेशीर समितीची बैठक ७ फेब्रुवारी रोजी होईल.बोर्डाच्या युक्तिवादावर असमाधान व्यक्त करीत न्या. ठाकूर म्हणाले,‘समितीच्या शिफारशी स्पष्ट, योग्य, न्यायसंगत आणि बोध घेण्याजोग्या आहेत. बोर्डाने या शिफारशी मानल्या नाहीत तर समिती पुढचा मार्ग स्वत: काढेल.’ (वृत्तसंस्था)