शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

लोढा समितीच्या शिफारशी इतर खेळांत लागू करा

By admin | Updated: January 24, 2017 00:38 IST

भारतीय क्रिकेट बोर्डाच्या प्रशासकीय कामकाजात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या लोढा पॅनलच्या शिफारशी देशातील अन्य क्रीडा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट बोर्डाच्या प्रशासकीय कामकाजात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या लोढा पॅनलच्या शिफारशी देशातील अन्य क्रीडा संघटनांनादेखील लागू व्हाव्यात, यासाठी काही माजी खेळाडूंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करण्यास सहमती दर्शविली.सरन्यायाधीश जे. एस. केहार यांनी यासंदर्भात केंद्र शासन, भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि भारतीय आॅलिम्पिक संघटनेला नोटीस बजावली असून, ही याचिका बीसीसीआयमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या लोढा समितीच्या शिफारशींशी संबंधित याचिकांसोबत जोडण्यात आली आहे.याचिकेद्वारे बीसीसीआयमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या लोढा समितीच्या शिफारशींचा २०११ च्या भारतीय क्रीडाविकास संहितेत समावेश करण्यासाठी केंद्र सरकारला निर्देश देण्याची विनंती करण्यात आली. विविध खेळांशी संबंधित २८ खेळाडूंनी याचिका दाखल केली असून, राष्ट्रीय क्रीडा महासंघ व त्यांच्याशी संलग्न राज्य संघटनांच्याकामकाजात पारदर्शीपणा आणण्यासाठी लोढा समितीच्या काही शिफारशींचा राष्ट्रीय क्रीडा संहितेतही अंतर्भाव करण्याचा केंद्राला आदेश देण्याची विनंती केली आहे.लोढा समितीने आपल्या अहवालात बीसीसीआयच्या कामकाजात आमूलाग्र बदल सुचविले आहेत. शिफारशीनुसार मंत्री हे कुठल्याही क्रीडा संघटनेत पदाधिकारी बनू शकत नाहीत. पदाधिकाऱ्यांसाठी वयोमर्यादा ७० वर्षे इतकी राहील. याशिवाय एखाद्या पदाधिकाऱ्याला जास्तीत जास्त नऊ वर्षे पदावर राहता येईल. याचिका दाखल करणाऱ्या माजी खेळाडूंमध्ये हॉकीपटू अशोककुमार, बिशनसिंग बेदी, कीर्ती आझाद, अश्विनी नाचप्पा आणि प्रवीण ठिपसे यांचा समावेश आहे.(वृत्तसंस्था)