शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

"लंकादहन"साठी विराटसेनेची घोषणा

By admin | Updated: July 9, 2017 21:40 IST

वेस्ट इंडिज विरोधातील वनडे मालिका 3-1ने जिंकल्यानंतर भारतीय संघ 26 जुलैपासून श्रीलंका दौऱ्यावर जात आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 9 - वेस्ट इंडिज विरोधातील वनडे मालिका 3-1ने जिंकल्यानंतर भारतीय संघ 26 जुलैपासून श्रीलंका दौऱ्यावर जात आहे. तीन कसोटी सामन्यासाठी 16 सदस्यांची निवड करण्यात आली आहे. के. एल. राहुलचे संघात पुनरागमन झाले आहे. तर अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधारपद कायम ठेवण्यात आली आहे. श्रीलंकेच्या दौऱयात भारतीय संघ तीन कसोटी, 5 वनडे व 1 टी-20 सामना खेळणार आहे. त्याआधी दोन्ही संघांसाठी दोन सराव सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. 21 व 22 जुलै रोजी हे सराव सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेतील पहिली कसोटी 26 जुलैपासून कँडी येथे, दुसरी कसोटी 3 ऑगस्टपासून गॅले तर तिसरी व शेवटची कसोटी 12 ऑगस्टपासून कोलंबो येथे खेळवण्यात येणार आहे. 20 ऑगस्टपासून वनडे मालिकेला प्रारंभ होणार आहे. मालिकेतील एकमेव टी-20 सामना 6 सप्टेंबररोजी कोलंबो येथे खेळवण्यात येणार आहे.

मायदेशात ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर भारतीय संघाची ही पहिलीच कसोटी मालिका असणार आहे. यामुळे या मालिकेत भारतीय संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अनिल कुंबळे यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही सूत्रे कोणाकडे जातात व नवीन प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणेही महत्वाचे ठरेल.

असा आहे भारतीय संघ - विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, के.एल.राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहीत शर्मा,रवींद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), इशांत शर्मा, उमेश यादव, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी,कुलदीप यादव आणि अभिनव मुकुंद.भारतीय संघाचा संपूर्ण श्रीलंका दौरा कसोटी मालिका -पहिली कसोटी 26 ते 30 जुलै गॅलेदुसरी कसोटी 3 ते 7 ऑगस्ट कोलंबोतिसरी कसोटी 12 ते 16 ऑगस्ट पल्लीकल

वनडे मालिका -पहिली वनडे 20 ऑगस्ट डाम्बुलादुसरी वनडे 24 ऑगस्ट पल्लीकलतिसरी वनडे 27 ऑगस्ट पल्लीकलचौथा वनडे 31 ऑगस्ट कोलंबोपाचवी वनडे 3 सप्टेंबर कोलंबो

टी-20 मालिका -एकमेव टी-20 सामना 6 सप्टेंबर कोलंबो