शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

...तर २००४ अथेन्स आॅलिम्पिकसाठी अंजू बॉबी जॉर्जला मिळेल रौप्यपदक

By admin | Updated: March 30, 2017 01:21 IST

लांब उडीच्या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा लौकीक वाढवणारी भारताची अव्वल अ‍ॅथलिट अंजू बॉबी जॉर्जला

नवी दिल्ली : लांब उडीच्या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा लौकीक वाढवणारी भारताची अव्वल अ‍ॅथलिट अंजू बॉबी जॉर्जला २००४ च्या अथेन्स आॅलिम्पिक स्पधेर्साठी रौप्यपदक मिळू शकते. अथेन्समध्ये लांब उडीमधील महिला गटातील पदक विजेत्यांची चौकशी केली तर, अंजूच्या नावावर आॅलिम्पिक रौप्यपदकाची नोंद होऊ शकते. २००३ साली पॅरिस येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अंजूने कांस्यपदक मिळवल्यानंतर अथेन्स आॅलिम्पिकमध्ये तिच्याकडून पदकाची अपेक्षा होती. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला अ‍ॅथलिट आहे. अथेन्समध्ये लांब उडीच्या अंतिम फेरीत अंजूला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. आॅस्ट्रेलियाची ब्रॉनवायन थॉम्पसनला चौथे तर, जाडे जॉन्सनला सहावे स्थान मिळाले होते. या स्पर्धेत अंजूने ६.८३ मीटर एवढी लांब उडी मारत नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. जो अजूनही कायम आहे. अथेन्समध्ये लांब उडीमध्ये रशियन महिला अ‍ॅथलिटसनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकावर नाव कोरले होते. तातयाना लीबीडेवा, इरीना सीमाजीना आणि तातयाना कोटोवा या लांब उडीतील पदक विजेत्या तिन्ही अ‍ॅथलिटसनंतर डोप चाचणीत पकडल्या गेल्या. अथेन्समध्ये सुवर्णपदक मिळवणा-या लीबीडेवाचा उत्तेजक चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर २००८ बिजींग आॅलिम्पिकमध्ये तीने जिंकलेली दोन रौप्यपदके तिच्याकडून काढून घेण्यात आली. इरीना डोप चाचणीत सापडल्याने २०१२ मध्ये तिच्यावर दोनवर्षांची बंदी घालण्यात आली. त्यामुळे तिला लंडन आॅलिम्पिकमध्ये सहभागी होता आले नाही. कोटोव्हाचे नमुने सुद्धा २०१३ मध्ये पॉझिटीव्ह आल्यानंतर तिच्याकडून २००५ वर्ल्ड चॅम्पियनशीपमधील पदक काढून घेण्यात आले. (आॅनलाइन लोकमत)