शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

अनिल, ज्योती कांस्यपदकाचे मानकरी

By admin | Updated: May 12, 2017 01:00 IST

आशियाई कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये भारताच्या अनिलकुमार आणि ज्योती यांनी दुसऱ्या दिवशी आज येथे आपआपल्या गटात कांस्यपदके

नवी दिल्ली : आशियाई कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये भारताच्या अनिलकुमार आणि ज्योती यांनी दुसऱ्या दिवशी आज येथे आपआपल्या गटात कांस्यपदके जिंकली. दुसरीकडे महिलांच्या ५३ कि.गटात रितूचे पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले.अनिलने ग्रीको रोमनच्या ८५ किलो गटात उज्बेकिस्तानच्या मुहम्मदाली शमसिदिनोव्हविरुध्द शानदार पुनरागमन करताना ७-६ असा विजय मिळवून कांस्यपदक पटकावले. महिला गटात ज्योतीला ७५ किलो वजन गटात सेमीफायनलमध्ये जपानच्या मसाको फुरुची हिच्याकडून हरल्यामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. दिवसभरात एकूण पाच सामने झाले, त्यापैकी भारताने दोन सामन्यात पदके मिळवली. ८५ किलो गटातील मल्ल अनिलकुमारलादेखील पराभव पत्कारावा लागला. त्याला जपानच्या अतसुशी मासुमोतो याने ७-0 असे पराभूत केले. परंतु तोसुध्दा फ्लेआॅफमध्ये पोहचण्यात यशस्वी झाला, कारण जपानी पैलवानाने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते. उज्बेकस्तानच्या मुहम्मदाली शमसिदिनोव याच्याविरुध्दच्या लढतीत अनिल एका वेळेस १-६ असा पिछाडीवर होता. परंतु अनिलने प्रतिस्पर्ध्याच्या तावडीतून स्वत:ची सुटका करुन घेत त्याला खाली पाडून दोन गुणांची कमाई केली. यानंतर २९ वर्षीय भारतीय मल्लाने मागे वळून न पाहता कांस्यपदकाला गवसणी घातली.महिलांच्या ७५ किलो वजन गटात भारताच्या ज्योतिला जपानच्या फुरुचीकडून पराभूत व्हावे लागले, त्यानंतर तिला रेपाशाजमध्ये कोणी प्रतिस्पर्धी नसल्याने कांस्यपदक तिच्या गळ्यात पडले. रितूने महिलांच्या ६३ किलो गटात कांस्यपदकासाठी चांगली लढत दिली परंतु शेवटी ती कोरियाच्या जिनयंगकडून पराभूत झाली. पुरुषांच्या ७१ किलो वजन गटात किर्गीस्तानच्या नुरगेजी असनगुलोवकडून पराभूत झाल्याने भारताच्या दीपकलाही कांस्यपदक जिंकता आले नाही. अन्य एक ग्रिको रोमन आणि महिला मल्ल ज्ञानेंद्र (५९) आणि ज्योती (७५) हे आज सकाळीच पराभूत होवून स्पर्धेतून बाहेर पडले.(वृत्तसंस्था)