शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

... अन् सचिनने काढली सेल्फी

By admin | Updated: February 22, 2015 15:03 IST

रविवारी दक्षिण आफ्रिकाविरुद्धचा सामना बघण्यासाठी मेलबर्न स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर उपस्थित होता व सचिनला बघताच मैदानातील प्रेक्षकांनी सचिन...सचिन असा जयघोष करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

 ऑनलाइन लोकमत 

मेलबर्न, दि. २२ -  मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यंदाच्या विश्वचषकात खेळत नसला तरी मैदानात मॅच बघण्यासाठी आलेल्या सचिनच्या एका झलकनेही प्रेक्षक सुखावतात. रविवारी दक्षिण आफ्रिकाविरुद्धचा सामना बघण्यासाठी मेलबर्न स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर उपस्थित होता व सचिनला बघताच मैदानातील प्रेक्षकांनी सचिन...सचिन असा जयघोष करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. सामन्या दरम्यान सचिनने सेल्फीही काढली. 
वर्ल्डकप २०१५ मध्ये भारतीय संघ सचिन तेंडुलकरविना मैदानात उतरला आहे. सहा विश्वचषकात भारताचे प्रतिनिधीत्व करणा-या सचिनची उणीव क्रिकेटप्रेमींना आजही जाणवत असते. क्रिकेटच्या देवाची प्रेक्षकांवरील जादू तसूभरही कमी झालेली नाही. रविवारी दक्षिणआफ्रिकाविरुद्धचा सामना बघण्यासाठी सचिन तेंडुलकर स्टेडियममध्ये उपस्थित होता.  स्टेडियममधील मोठ्या स्क्रीनवर सचिन दिसताच भारतीय संघाच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. विशेष म्हणजे हा जल्लोष सुरु असताना ना कोणत्याही फलंदाजांची चौकार मारला होता ना कोणत्या संघाची विकेट गेली. सचिनला बघून प्रेक्षक जल्लोष करत होते आणि मैदानात सचिन सचिन अशा घोषणा सुरु होत्या.प्रेक्षकांकडून जोरदार स्वागत झाल्यावर सचिनने सेल्फीही काढली.