कोलकाता : बॉलिवूड सुपरस्टार आणि या शतकातील महानायक अमिताभ बच्चन शनिवारी (दि. १९) भारत-पाकिस्तान यांच्यातील इडनगार्डनमध्ये होणाऱ्या वर्ल्डकप टी-२० वर्ल्डकप क्रिकेट सामना सुरू होण्याआधी राष्ट्रगीत गाणार आहेत.याविषयी बच्चन यांनी आपल्या टिष्ट्वटरवर एका पोस्टमध्ये याला दुजोराही दिला आहे. अमिताभ बच्चन यांनी याआधी एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये समालोचनही केले आहे. बंगाल क्रिकेट संघटनेच्या (कॅब) सूत्रांनी कॅबचे अध्यक्ष सौरभ गांगुलीच्या प्रयत्नामुळे अमिताभ राष्ट्रगीत गाणार असल्याचे सांगितले. पाकिस्तानचे क्लासिकल गायक शफकत अमानत अली पाकिस्तानचे राष्ट्रगीत गाणार आहेत.
अमिताभ भारत-पाक सामन्याआधी राष्ट्रगीत गाणार
By admin | Updated: March 17, 2016 03:48 IST