शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकन ओपन बॅडमिंटन : भारतीय शटलर्सचा दबदबा...

By admin | Updated: July 7, 2016 17:39 IST

कॅनडा ओपनमध्ये भारतीयांनी दबदबा राखल्यानंतर सध्या सुरु असलेल्या अमेरिकन ओपनमध्येही वर्चस्व राखताना आपली विजयी घोडदौड कायम राखली. भारताच्या एकूण ६ खेळाडूंनी उप - उपांत्यपुर्व फेरीत धडक

ऑनलाइन लोकमत एल मोंटे, दि. ७ : कॅनडा ओपनमध्ये भारतीयांनी दबदबा राखल्यानंतर सध्या सुरु असलेल्या अमेरिकन ओपनमध्येही वर्चस्व राखताना आपली विजयी घोडदौड कायम राखली. भारताच्या एकूण ६ खेळाडूंनी उप - उपांत्यपुर्व फेरीत धडक मारताना लक्षवेधी कामगिरी केली आहे. पुरुष एकेरीत सहाव्या मानांकीत कॅनडा ओपन विजेत्या साई प्रणीतने आपल्या लौकिकानुसार दिमाखदार आगेकूच करताना कॅनडाच्या के. बी. संकीर्तचा २१-१५, २१-७ असा धुव्वा उडवला. उप-उपांत्यपुर्व फेरीत प्रणीतचा सामना जपानच्या कुजुमासा सकाई विरुध्द होईल. सकाईने भारताच्याच आर.एम.व्ही. गुरुसाईदत्तचा २१-१७, २१-१२ असा पाडाव करुन विजय मिळवला.पाचव्या मानांकीत एच. एस. प्रणयने देखील अपेक्षित आगेकूच करताना आयर्लंडच्या जोशुआ मॅगीचे आव्हान २१-९, २१-८ असे परतावले. एकतर्फी झालेल्या या सामन्यात प्रणयने मॅगीला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. पुढील फेरीत कॅनडा ओपनचा उपविजेता कोरियाच्या ली ह्यून इलचे तगडे आव्हान प्रणयसमोर असेल.युवा खेळाडू प्रतुल जोशीने देखील चमकदार कामगिरी करताना झेक प्रजासत्ताकच्या मिलान लुडीकचे कडवे आव्हान २१-१८, २१-१३ असे संपुष्टात आणले. उप-उपांत्यपुर्व फेरीत प्रतुल भारताच्याच आनंद पवारविरुद्ध भिडेल. आनंदने आॅस्ट्रीयाच्या डेव्हीड ओबरनोस्टरचा २१-१२ २१-९ असा दणदणीत पराभव केला. त्याचप्रमाणे चौथ्या मानांकीत अजय जयरामने एस्टोनियाच्या राऊल मस्टला २१-१४, २१-९ असे लोळवून उप-उपांत्यपुर्व फेरी गाठली.