शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

आॅल इज ‘गेल’!

By admin | Updated: April 12, 2015 01:07 IST

केकेकआरने उभारलेले १७७ धावांचे तगडे ‘चॅलेंज’ बंगळूरुने लिलया पेलले. या रोमाचंक सामन्यात चमकला तो ख्रिस गेल.

बंगळूरुचा केकेआरवर ३ गडी व ६ चेंडू राखून रोमहर्षक विजयकोलकाता : केकेकआरने उभारलेले १७७ धावांचे तगडे ‘चॅलेंज’ बंगळूरुने लिलया पेलले. या रोमाचंक सामन्यात चमकला तो ख्रिस गेल. त्याच्या धुव्वाधार ९६ धावांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने ३ गडी आणि ६ चेंडू राखत विजय मिळवला. गेलने अवघ्या ५६ चेंडूंत ७ चौकार आणि ७ षटकारांची आतषबाजी करीत ९६ धावा कुटल्या. त्याच्या ह्याच धावा केकेआरसाठी निराशाजनक ठरल्या. डिव्हिलियर्सच्या १३ चेंडूंत २८ धावा सुद्धा महत्वपूर्ण ठरल्या. इतर फलंदाज मात्र झटपट बाद झाले. मात्र संपूर्ण सामना गाजवला तो ख्रिस गेल यानेच. शतकाला अवघ्या चार धावा शिल्लक असताना तो दुदैवीपणे धावबाद झाला आणि गेलची वादळी खेळी संपुष्टात आली. विराटने १३ धावा केल्या. त्याआधी, गंभीरचे शानदार अर्धशतक (५८) आणि आंद्रे रसेलच्या १७ चेंडूंत ४१ धावांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूपुढे २० षटकांत ६ बाद १७७ धावांचे आव्हान उभे केले होते. ईडन गार्डन्सवरील या सामन्यात बंगळुरूने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय कोलकात्याच्या गौतम गंभीर आणि रॉबिन डिसोझाने चुकीचा ठरवला. त्यांनी पहिल्या गड्यासाठी ८१ धावांची भागीदारी केली. अवघ्या १० षटकांत त्यांनी या धावा फटकावल्या. रॉबिन ३५ धावांवर सॅमीकरवी झेलबाद झाला. अर्धशतक झळकावून गौतम गंभीर बाद झाला. तेव्हा कोलकात्याने शतकी धावसंख्या गाठली होती. त्यानंतर मनीष पांडे (२३), सूर्यकुमार यादव (११), युसूफ पठाण (३) यांनी योगदान देण्याचा प्रयत्न केला. पांडे बाद झाल्यानंतर कोलकात्याची धावगती कमी झाली होती. त्याच वेळी आंद्रे रसेलने विस्फोटक फटकेबाजी केली. त्याने अवघ्या १७ चेंडूंत ४१ धावा फटकावल्या. यात त्याच्या ६ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. बंगळुरूकडून वरुण अ‍ॅरोन, हर्षल पटेल, अबू नचिम आणि चहल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलककोलकाता नाईट रायडर्स :- उथप्पा झे. नचिम गो. सॅमी ३५, गंभीर झे. मनदिप गो. चाहल ५८, पांडे धावबाद २३, सुर्यकुमार यादव झे. मनदिप गो. पटेल ११, युसूफ पठाण झे. कोहली गो. अ‍ॅरोन ३, आंद्रे रसेल नाबाद ४१, शकीबूल हसन धावबाद ०. २० षटकांत ६ बाद १७७. गोलंदाजी : अ‍ॅबोट ३-०-३६-०, पटेल ४-०-३७-१, अ‍ॅरोन ४-०-३८-१, नचिम ४-०-२८-१, सॅमी १-०-७-०. चाहल ४-०-२८-१.रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु : गेल धावबाद ९६, कोहली झे. उथप्पा गो. मार्केल १३, कार्तिक त्रि. गो. पठाण ६, मनदिप सिंग त्रि. गो. पठाण ६, डिव्हिलियर्स यष्टिचित उथप्पा गो. कॅरियप्पा २८, सॅमी यष्टिचित गो. शकिब अल हसन ७. गोलंदाजी : मार्केल ३५/१, पठाण ४०/२.