शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
5
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
6
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
7
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
8
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
9
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
10
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
11
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
12
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
13
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
14
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
15
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
16
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
17
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
18
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
19
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
20
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना

सर्व कर्णधार व्यासपीठावर

By admin | Updated: February 13, 2015 00:46 IST

:समारंभाला आजी-माजी खेळाडूंसोबत ८० बालके होती. या वेळी सहभागी १४ देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १४ मैदानांना ४ विभागांत विभागण्यात येऊन

ख्राईस्टचर्च :समारंभाला आजी-माजी खेळाडूंसोबत ८० बालके होती. या वेळी सहभागी १४ देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १४ मैदानांना ४ विभागांत विभागण्यात येऊन प्रतीकात्मक क्रिकेट खेळविण्यात आले. सर्व चारही विभागांपुढे व्यासपीठ बनविण्यात आले होते. या व्यासपीठावर भारत आणि श्रीलंकेच्या सांस्कृतिक कलावंतांसह वेस्ट इंडीजचा स्टील बँड, स्कॉटलंड आणि आयर्लंडच्या कलावंतांनी व स्थानिक माओरी हाका समूहानेदेखील कला सादर केली. हजारावर कलावंतांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.न्यूझीलंडमध्ये उपस्थित असलेल्या सर्व संघांच्या कर्णधारांनी आपापल्या राष्ट्रध्वजांसह प्रेक्षकांपुढे हजेरी लावली. मोठ्या व्यासपीठावर विश्वचषक ठेवण्यात आला होता. पहिल्यांदा स्पर्धेत खेळणाऱ्या अफगाण संघाचा कर्णधार मोहंमद नबी याचे सर्वप्रथम आगमन झाले. पाठोपाठ बांगलादेशाचा कर्णधार मुशर्रफ मुर्तझा, इंग्लंडचा कर्णधार इयान मोर्गन, गतविजेत्या भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, आयर्लंडचा कर्णधार विल्यम्स पोर्टरफिल्ड, पाकचा कर्णधार मिस्बाह उल् हक, स्कॉटलंडचा कर्णधार प्रेस्टन मौमसेन, यूएईचा मोहंमद तौकीर, विंडीजचा जेसन होल्डर आणि आॅस्ट्रेलियाचा मायकेल क्लार्क हे व्यासपीठावर आले. (वृत्तसंस्था)