शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
8
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
9
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
10
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
11
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
12
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
13
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
14
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
15
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
16
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
17
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
18
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
19
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
20
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"

पुन्हा ‘चोकर्स’

By admin | Updated: March 8, 2015 01:43 IST

पाकिस्तानने गोलंदाजीची दमदार कामगिरी करून विश्वचषकाच्या मोहिमेत मोठा अडसर असलेल्या द. आफ्रिकेला शनिवारी ‘ब’ गटाच्या रोमहर्षक लढतीत डकवर्थ-लुईस नियमानुसार २९ धावांनी नमविले.

पाकचा २९ धावांनी विजय : यष्टीरक्षक सर्फराजचे विक्रमी सहा झेलआॅकलंड : पाकिस्तानने गोलंदाजीची दमदार कामगिरी करून विश्वचषकाच्या मोहिमेत मोठा अडसर असलेल्या द. आफ्रिकेला शनिवारी ‘ब’ गटाच्या रोमहर्षक लढतीत डकवर्थ-लुईस नियमानुसार २९ धावांनी नमविले.या विजयानंतर पाकचे पाच सामन्यांत सहा गुण झाल्याने क्वार्टर फायनलच्या अपेक्षा वाढल्या आहेत. द. आफ्रिकेचेही पाच सामन्यांत सहा गुण आहेत. पाकला अखेरचा सामना १५ मार्च रोजी आयर्लंडविरुद्ध खेळायचा असून, कुठल्याही स्थितीत विजय आवश्यक असेल.पावसाच्या व्यत्ययात प्रत्येकी ४७ षटकांच्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकचा डाव मिस्बाह उल् हक (५६) व यष्टीरक्षक सर्फराज अहमद (४९) यांच्या चिवट झुंजीनंतरही ४६.४ षटकांत सर्व बाद २२२ असा संपुष्टात आला. द.अ ाफ्रिकेला यानंतर २३२ धावांचे सुधारित लक्ष्य मिळाले. त्यात कर्णधार एबी डिव्हिलियर्सच्या ७७ धावांनंतरही पाकच्या गोलंदाजीपुढे त्यांच्या फलंदाजांनी ३३.३ षटकांत २०२ धावांत गुडघे टेकले. पाककडून वेगवान गोलंदाज राहत अली, वहाब रियाझ आणि मोहंमद इरफान यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. सोहेल खानला डिव्हिलियर्सचा बळी घेता आला. द.आफ्रिकेचे ७ फलंदाज १३८ धावांवर तंबूत परतल्यानंतर डिव्हिलियर्सने डेल स्टेन (१६), एबोट (१२) तसेच मोर्केल (नाबाद ६) यांच्यासोबत क्रमश: सातव्या, आठव्या आणि नवव्या गड्यासाठी अनुक्रमे ३६, ३४ आणि २८ धावांची भागीदारी केली. सोहेलने ३३व्या षटकांत ५८ चेंडूंत सात चौकार व पाच षटकार मारणाऱ्या डिव्हिलियर्सला सर्फराजकडे झेल देण्यास भाग पाडताच आफ्रिकेच्या विजयाच्या आशा मावळल्या. पाकच्या डावाची सुरुवात करणाऱ्या सर्फराजने ४९ चेंडूंत पाच चौकार व तीन षटकारांसह ४९ धावा केल्या, तर मिस्बाहने अर्धशतक ठोकले. अनुभवी युनूस खान ३७, आफ्रिदी २२ यांनी सुरुवात झकास केली; पण मोठी खेळी करण्यात त्यांना अपयश आले. सर्फराज-युनूस यांनी दुसऱ्या गड्यासाठी ६२ धावांची भागीदारी केली. (वृत्तसंस्था) ४२ अर्धशतके पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह-उल-हक याने वनडेमध्ये अशी झळकाविली आहेत, की ज्यामध्ये एकही शतक झालेले नाही. त्याच्यानंतर एकही शतक न करता २५ अर्धशतके न्यूझीलंडच्या अँड्र्यू जोन्सच्या नावावर आहेत.०६ झेल घेण्याचा विक्रम पाकिस्तानचा यष्टीरक्षक सर्फराज अहमद याने आज केला आहे. एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासात हे १५ वेळा घडले आहे, विश्वचषकाचा विचार करता अशी कामगिरी करणारा तो दुसरा यष्टीरक्षक आहे, यापूर्वी २००३ मध्ये अ‍ॅडम गिलख्रिस्टने नामिबियाविरुद्ध हा पराक्रम केला होता.१२४ ए. बी. डिव्हीलियर्सचा हा गेल्या ३१ वनडेतील स्ट्राईक रेट आहे. यात त्याची सहा शतके व १० अर्धशतके आहेत. मिस्बाहच्या पाच हजार धावा मिस्बाहने ८६ चेंडूंत ४ चौकार मारले. यादरम्यान त्याने वन डेत पाच हजार धावांचा पल्ला गाठला. तब्बल ४२ अर्धशतकांची नोंद करणाऱ्या मिस्बाहला अद्याप वन डेत शतक मात्र ठोकता आलेले नाही.पाकिस्तान : अहमद शहजाद झे. स्टेन गो. एबोट १८, युनीस खान झे. रोसेयू गो. डिव्हिलियर्स ३७, मिस्बाह उल् हक झे. मोर्केल गो. स्टेन ५६, शोएब मकसूद झे. रोसेयू गो, एबोट ८, उमर अकमल झे. डिव्हिलियर्स गो. मोर्केल १३, शाहीद आफ्रिदी झे. ड्युमिनी गो. स्टेन २२, वहाब रियाझ पायचित गो. ताहीर ०, सोहेल खान झे. ड्युमिनी गो. मोर्केल ३, राहत अली झे. ताहीर गो. स्टेन १, मोहंमद इरफान नाबाद १, अवांतर : १४, एकूण : ४६.४ षटकांत सर्व बाद २२२ धावा. गडी बाद क्रम १/३०, २/९२, ३/१३२, ४/१५६, ५/१७५, ६/२१२, ७/२१२, ८/२१८, ९/२२१. गोलंदाजी : स्टेन १०-३-३०-३, एबोट ९-०-४५-२, मोर्केल ९.४-०-२५-२, ताहीर ९-१-३८-१, ड्युमिनी ३-०-३४-०.द. आफ्रिका : क्विंटन डिकॉक झे. सर्फराज गो. इरफान ०, हाशीम अमला झे. सर्फराज गो. वहाब ३८, फाफ ड्युप्लेसिस झे. सर्फराज गो. राहत २७, रिली रोसेयू झे. सोहेल गो. वहाब ६, डिव्हिलियर्स झे. सर्फराज गो. सोहेल ७७, डेव्हिड मिलर पायचित गो. राहत ०, जेपी ड्युमिनी झे. वहाब गो. इरफान १२, डेल स्टेन झे. सर्फराज गो. इरफान १६, काइल एबोट झे. युनीस गो. राहत १२, मोर्ने मोर्केल नाबाद ६, इम्रान ताहीर झे. सर्फराज गो. वहाब ०, अवांतर : ८, एकूण : ३३.३ षटकांत सर्व बाद २०२ धावा. गडी बाद क्रम : १/०, २/६७, ३/६७, ४/७४, ५/७७, ६/१०२, ७/१३८, ८/१७२, ९/२००. गोलंदाजी : इरफान ८-०-५२-३, सोहेल ५-०-३६-१, राहत ८-१-४०-३, आफ्रिदी ५-०-२८-०, वहाब ७.३-२-४५-३.