शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कर भरल्यानंतर होळकर स्टेडियमचे टाळे उघडले

By admin | Updated: April 1, 2017 01:02 IST

मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेद्वारे (एमपीसीए) २९ लाख रुपयांपेक्षा जास्त संपत्ती कर आणि अन्य कर भरल्यानंतर या संघटनेच्या

इंदौर : मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेद्वारे (एमपीसीए) २९ लाख रुपयांपेक्षा जास्त संपत्ती कर आणि अन्य कर भरल्यानंतर या संघटनेच्या अधिकाऱ्याचे कार्यालय आणि होळकर स्टेडियमच्या दोन मुख्य द्वारावर लावण्यात आलेले टाळे शुक्रवारी उघडण्यात आले. त्यामुळे या स्टेडियममध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या तीन आयपीएल सामन्यांच्या आयोजनावरील घोंगावत असणारे संकट टळले आहे.एमपीसीएने संपत्ती कर आणि स्थानिक करासाठीचा २९.१0 लाख रुपयांचा धनादेश महानगरपालिकेला आज दिला. त्यानंतर एमपीसीएच्या प्रशासनिक भवनातील संघटनेचे मुख्य अधिकाऱ्यांचे कार्यालय आणि याच परिसरातील होळकर स्टेडियममधील दोन मुख्य द्वारांवर लावण्यात आलेले टाळे काढण्यात आल्याचे महानगरपालिका उपायुक्त प्रतापसिंह सोलंकी यांनी सांगितले. कर न भरल्यामुळे महानगरपालिकेने गुरुवारी, ३0 मार्चला एमपीसीए परिसरात टाळे ठोकले होते. किंग्ज इलेव्हन पंजाबने इंदौर येथील होळकर स्टेडियम आपले घरचे मैदान बनविले आहे. हा संघ ८, १0 आणि २0 एप्रिल रोजी तीन आयपीएल सामने खेळणार आहे. हे सामने अनुक्रमे रायजिंग पुणे सुपरजाएंट, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्याविरुद्ध खेळविले जाणार आहेत.