शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

वाद-विवादानंतर आॅलिम्पिकचे बिगुल ५ आॅगस्टपासून वाजणार

By admin | Updated: July 5, 2016 18:43 IST

गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकलेले आणि आर्थिक समस्यांचा मारा झेलणाऱ्या रिओ डी जेनेरिओमध्ये ५ आॅगस्टपासून आॅलिम्पिकचा धडाका रंगेल.

ऑनलाइन लोकमत

रिओ डी जेनेरिओ, दि. ५ : गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकलेले आणि आर्थिक समस्यांचा मारा झेलणाऱ्या रिओ डी जेनेरिओमध्ये ५ आॅगस्टपासून आॅलिम्पिकचा धडाका रंगेल. विशेष म्हणजे यासह हा क्रीडा कुंभमेळा आयोजित करणारा पहिला दक्षिण अमेरिकी देश म्हणून ब्राझील नवा इतिहासही रचेल.

स्पर्धेसाठी सर्व स्टेडियम सज्ज असून त्यांना आता फिनिशिंग टच दिला जात आहे. ५ ते २१ आॅगस्ट दरम्यान रंगणाऱ्या या जागतिक क्रीडा महोत्सवासाठी ब्राझीलमध्ये सुमारे ५ लाखहून अधिक क्रीडाप्रेमींची उपस्थिती राहण्याची शक्यता आहे. रिओ शहर पुर्णपणे सज्ज असून मला माझ्या शहराचा गर्व आहे,ह्णह्ण असे रिओचे राज्यपाल एडुआर्डो पेस यांनी सांगितले. खेळाडू आणि पदकांच्याबाबतीत सांगायचे झाल्यास वेगाचा बादशाह उसेन बोल्टपासून विश्वविक्रमी जादुई स्वीमर मायकल फेल्प्स सारख्या अनेक दिग्गज खेळाडूंसह १० हजार खेळाडू पदकांच्या शर्यतीत आहेत. एकीकडे जगभरातील खेळाडू आॅलिम्पिकमध्ये स्वत:ची छाप पाडण्यासाठी रिओमध्ये मोठ्या तयारीने येत असताना, दुसरीकडे स्थानिक नागरिकांकडून मात्र या सोहळ्यालाच विरोध होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

रिओ शहरात वाढ होणाऱ्या गुन्हेगारीमुळे शहराची बदनामी होत आहे. शहरात खून प्रकरणही वाढले असून रस्त्यांवर होणाऱ्या गुन्ह्यांतही वाढ झाली आहे. त्यातच सोमवारी रिओ शहराच्या मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळावर १०० हून अधिक अधिकाऱ्यांनी स्वागत कक्षामध्ये नरकामध्ये तुमचे स्वागत आहेह्ण अशा आशयाचे फलक लावून विरोध केला. अनुभवी पोलिस अधिकारी अलेक्झेंडर नेतो यांनी सांगितले, आम्ही येथे नागरिकांना आणि जगभरातील पर्यटक व क्रीडाप्रेमींना ब्राझीलची वस्तुस्थिती सांगण्यास आलो आहोत. त्यांना व आम्हाला मुर्ख बनविण्यात आले आहे. येथे सर्वसामन्यांची सुरक्षा व्यवस्थेसारखे काहीही नाही. या सर्व विरोध प्रदर्शनाबरोबरच आर्थिक मंदी आणि झिका वायरस सारखे संकटही स्पर्धा आयोजकांपुढे आ वासून उभे आहेत.स्पर्धा आयोजनांपुर्वीच रिओ शहरामध्ये अनेक वाद उफाळून आले. रिओच्या रस्त्यांवर एकूण ८५ हजार पोलिस तैनात राहणार असून २०१२ लंडन आॅलिम्पिकच्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे. तसेच इस्तांबूल आणि बगदाद येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर आॅलिम्पिक स्पर्धेवरही संकटाचे ढग निर्माण झाले आहेत.