शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

अखेर रवी शास्त्रीच भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी

By admin | Updated: July 11, 2017 22:42 IST

भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची माळ अखेर रवी शास्त्रीच्या गळ्यात पडली आहे. तर झहीर खानची गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून

 ऑनलाइन लोकमत

 मुंबई, दि. 11 -  भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची माळ अखेर रवी शास्त्रीच्या गळ्यात पडली आहे. त्याबरोबरच गेल्या महिनाभरापासून भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाबाबत सुरू असलेल्या अटकळबाजीला पूर्णविराम मिळाला आहे. रवी शास्त्रीबरोबरच भारताच्या अन्य दोन माजी क्रिकेटपटूंकडे संघव्यवस्थापनामध्ये महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामध्ये माजी गोलंदाज झहीर खानची गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संघाच्या परदेश दौऱ्यादरम्यान राहुल द्रविड संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष  सी. के. खन्ना यांनी आज रात्री भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या निवडीबाबत अधिकृत घोषणा केली. 

कर्णधार विराट कोहलीची पहिली पसंत असल्याने प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत रवी शास्रीचे नाआव घाडीवर होते. दरम्यान, आज संध्याकाळी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्रीची निवड झाल्याचे वृत्त आले होते. पण बीसीसीआयने हे वृत्त फेटाळून लावले होते. त्यामुळे मुख्य प्रशिक्षकाच्या नावाबाबतची उत्सुकता वाढली होती. अखेर रात्री बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी रवी शास्त्री याची मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्याचे घोषित केले. त्याबरोबरच झहीर खानची गोलंदाजी प्रशिक्षक आणि, राहुल द्रविडची परदेश दौऱ्यासाठी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केल्याचेही त्यांनी जाहीर केले. 
अनिल कुंबळेचा कार्यकाळ शेवटच्या टप्प्यात असताना बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागविले होते. दरम्यान, कर्णधार विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यात मतभेद झाल्यानंतर भारतीय संघाला नवा प्रशिक्षक मिळणार हे निश्चित झाले होते. दरम्यान, कोहलीशी झालेल्या मतभेदांनंतर अनिल कुंबळेने संघाचे प्रशिक्षकपद तडकाफडकी सोडले होते. त्यानंतर वीरेंद्र सेहवाग, रवी शास्त्री, रिचर्ड पायबस, लालचंद राजपूत आणि टॉम मुडी यांच्यासह दहा जणांनी संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता. त्यापैकी पाच जणांच्या मुलाखती काल  पार पडल्या होत्या.