शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

11 वर्षानंतर हा खेळाडू खेळणार "चॅम्पियन्स ट्रॉफी"त

By admin | Updated: May 11, 2017 14:37 IST

1 ते 18 जून या कालावधीत इंग्लडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सोमवारी भारतीय संघाची निवड झाली. यामध्ये अनुभवी खेळाडूंना प्रधान्या देण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 11 - 1 ते 18 जून या कालावधीत इंग्लडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सोमवारी भारतीय संघाची निवड झाली. यामध्ये अनुभवी खेळाडूंना प्रधान्या देण्यात आले आहे. कदाचित तुम्हाला हे माहित नसेल की भारताचा मधल्या फळीतील फलंदाज युवराज सिंग तब्बल 11 वर्षानंतर चॅम्पियन ट्रॉफीमध्ये खेळत आहे. 2007 आणि 2011 मध्ये भारताने जिंकलेल्या आयसीसी विश्वचषकात युवराज सिंगचे मोलाचे योगदान होते. गतविजेत्या भारतीय संघात युवराजची वर्णी लागली नव्हती. केनियात 2002 मध्ये झालेल्या स्पर्धेद्वारे पदार्पण करणाऱ्या युवीने 2006 पर्यंतच्या सर्वच स्पर्धेत भाग घेतला. 2009 आणि 2013 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत युवराज सिंगची निवड झालेली नव्हती. त्यामुळे ही चॅम्पियन्स ट्रॉफी युवराज साठी म्हत्वाची असणार आहे. आयसीसीच्या टी 20 आणि 50 षटकांच्या विश्वचषकात त्याला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. युवराजच्या आंतराष्ट्रीय करियरमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी सोडचा आय़सीसीच्या सर्वच मोठ्या स्पर्धेत त्याने भारताचे नेतृत्व केले आहे. आणि त्यात त्याचे मोलाचे योगदान आहे. भारतीय संघात निवड झालेल्यानतंर माध्यमांशी बोलताना युवराजने चॅम्पियन्स ट्रॉफीतील आपले मनसुबे स्पष्ट केले. युवराज म्हणाला, 50 षटकांच्या सामन्यांसाठी भारतीय संघात पुनरागमन झाल्याबद्दल मी आनंदी आहे. जेतेपदाचा बचाव करता यावा, यासाठी संघाच्या विजयात योगदान देण्याची आपली तयारी असेल. अन्य कुठल्याही आयसीसी स्पर्धेसारखीच हीदेखील आव्हानात्मक स्पर्धा आहे. ओव्हलवर 18 जून रोजी अंतिम सामना खेळण्याच्या इराद्यानेच प्रत्येक संघ उतरणार, यात शंका नाही. मी 11 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार असल्याने योगदान देणे किती कठीण असते याची जाणीव आहे.भारताला गटात पाकिस्तान, द. आफ्रिका आणि श्रीलंकेसोबत स्थान मिळाले आहे. भारताने 2013 च्या विजेत्या संघातील आठ खेळाडूंना कायम ठेवले आहे. त्यात विराट कोहलीसह रविचंद्रन आश्विन, शिखर धवन, महेंद्रसिंह धोनी, भुवनेश्वर कुमार, रवींद्र जडेजा, रोहित शर्मा आणि उमेश यादव यांचा समावेश आहे. कोहली आयसीसीच्या कुठल्याही मोठ्या स्पर्धेत पहिल्यांदा भारताचे नेतृत्व करत आहे.

असा आहे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ -  

विराट कोहली (कर्णधार), रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, एमएस धोनी (यष्टीरक्षक), युवराज सिंग, केदार जाधव, हार्दीक पंडया, आर.अश्विन, रविंद्र जाडेजा, उमेश यादव, मोहम्मद शामी, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि मनीष पांडे. 
 

चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक

 

1 जून - इंग्लंड विरुद्ध बांगलादेश (ओव्हल)

2 जून - न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (एजबॅस्टन)

3 जून - श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका (ओव्हल)

4 जून - भारत विरुद्ध पाकिस्तान (एजबॅस्टन)

5 जून - ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश (ओव्हल)

6 जून - इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (कार्डीफ)

7 जून - पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका (एजबॅस्टन)

8 जून - भारत विरुद्ध श्रीलंका (ओव्हल)

9 जून - न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश (कार्डीफ)

10 जून - इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (एजबॅस्टन)

11 जून - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (ओव्हल)

12 जून - श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान (कार्डीफ)

14 जून - सेमीफायनल १ (कार्डीफ)

16 जून - सेमीफायनल २ (एजबॅस्टन)

18 जून - फायनल मॅच (ओव्हल)