शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
3
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
4
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
5
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
6
पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!
7
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
8
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
9
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
10
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
11
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
12
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
13
‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
14
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
15
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
16
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
17
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
18
आम्ही तुमची अर्थव्यवस्था चिरडून टाकू; रशियन तेल खरेदीमुळे अमेरिकेचा भारताला इशारा
19
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
20
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’

द. आफ्रिकेचा जम्बो दौरा

By admin | Updated: July 28, 2015 02:10 IST

दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताच्या ७२ दिवसांच्या दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यात ते ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात २ आॅक्टोबरपासून

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताच्या ७२ दिवसांच्या दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यात ते ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात २ आॅक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. सुरुवातीला या दोन देशांत तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याने होणार आहे. त्यानंतर पाच वन डे आणि चार कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. हा दक्षिण आफ्रिकेचा भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा दौरा असेल.पहिला टी-२० सामना २ आॅक्टोबरपासून धर्मशाळा येथे होणार आहे, तर अखेरचा टी-२० सामना कोलकाता येथे ८ आॅक्टोबरला खेळवला जाणार आहे. त्यानंतर कानपूर, इंदौर, राजकोट, चेन्नई, मुंबई येथे वन डे सामने खेळवले जाणार आहेत. मर्यादित षटकांच्या सामन्यानंतर पहिली कसोटी मोहाली येथे ५ ते ९ नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. त्यानंतर बंगळुरू, नागपूर, दिल्ली येथे तीन कसोटी सामने होणार आहेत. बीसीसीआय आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका यांनी आज संयुक्त रूपाने या दौऱ्याची घोषणा केली आहे.सीसीएचे मुख्य कार्यकारी हारुण लोर्गट म्हणाले, ‘‘हा भारताचा आमचा सर्वात मोठा दौरा असेल आणि प्रथमच आम्ही चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहोत. दोन्ही देश आता ही मालिका आयकॉन सिरीज बनण्याच्या दिशेने काम करीत आहे.’’ लोर्गट म्हणाले, ‘‘दुसरी कसोटी बंगळुरू येथे खेळवली जाणार आहे. जेथे दक्षिण आफ्रिकेने २००० मध्ये भारताविरुद्ध भारतात आपला एकमेव कसोटी मालिका विजय निश्चित केला होता. जर सर्व काही योग्य दिशेने होत राहिले तर हा अ‍ॅबी डिव्हिलियर्सचा १०० वा कसोटी सामना असेल आणि तो रॉयल चॅलेंजर्ससोबत जोडल्या गेल्यामुळे हे त्याचे दुसरे घरच आहे. त्यामुळे यापेक्षा दुसरे कोणते चांगले स्थळ असूच शकत नाही.’’२९ सप्टेंबर : टी-२० सराव सामना, दिल्ली२ आॅक्टोबर : पहिला टी-२० सामना, धर्मशाळा (दिवस-रात्र)५ आॅक्टोबर : दुसरा टी-२० सामना, कटक (दिवस-रात्र)८ आॅक्टोबर : तिसरा टी-२० सामना, कोलकाता (दिवस-रात्र)११ आॅक्टोबर : पहिला वन डे, कानपूर१४ आॅक्टोबर : दुसरा वन डे सामना, इंदोर (दिवस-रात्र)१८ आॅक्टोबर : तिसरा वन डे, राजकोट (दिवस-रात्र)२२ आॅक्टोबर : चौथा वन डे, चेन्नई (दिवस-रात्र)२५ आॅक्टोबर : पाचवा वन डे, मुंबई (दिवस-रात्र)३० ते ३१ आॅक्टोबर : अध्यक्षीय एकादश विरुद्ध सराव सामना (मुंबई)५ ते ९ नोव्हेंबर : पहिली कसोटी (मोहाली)१४ ते १८ नोव्हेंबर : दुसरी कसोटी (बंगळुरू)२५ ते २९ नोव्हेंबर : तिसरी कसोटी (नागपूर)३ ते ७ डिसेंबर : चौथी कसोटी (दिल्ली)