शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आगुतने ‘चेन्नई’ जिंकले

By admin | Updated: January 9, 2017 01:05 IST

एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात आक्रमक खेळ करताना स्पेनच्या रॉबर्टो बितिस्ता आगुतने रशियाच्या युवा खेळाडू डेनिल

चेन्नई : एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात आक्रमक खेळ करताना स्पेनच्या रॉबर्टो बितिस्ता आगुतने रशियाच्या युवा खेळाडू डेनिल मेदवेदेव याला ६-३, ६-४ असे नमवून चेन्नई ओपन पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले. आगुतचे हे करिअरमधील पाचवे एकेरी विजेतेपद ठरले. तर, मेदवेदेव आपल्या पहिल्या एटीपी वर्ल्ड टूर विजेतेपदापासून वंचित राहिला.आगुतने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेताना सामन्यावर आपले वर्चस्व राखले. त्याच्या वेगवान खेळापुढे मेदवेदेवला फारशी संधी मिळाली नाही. त्याचवेळी दबावाखाली झालेल्या चुकांचा फटकाही मेदवेदेवला बसला. मेदवेदेवला अनेकदा आपल्या चुकीच्या सर्विसच्या फटका बसला. तर, आगुतने आपल्या वेगवान व ताकदवर सर्विसच्या जोरावर मेदवेदेवला चांगलेच जेरीस आणले. एक तास ११ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या अंतिम सामन्यात आगुतने आपल्या सर्विसवर केवल ८ गुण गमावले. त्याचवेळी मेदवेदेवने अनेकदा आगुतला दिर्घ रॅली खेळण्यास भाग पाडले. परंतु, जम बसलेल्या आगुतने अनेक वेळा या रॅली आपल्या नावावर करीत गुणांची कमाई केली. मेदवेदेवने आश्वासक सुरुवात करताना आपल्या पहिल्या सर्विसवर गेम जिंकला. मात्र, यानंतर त्याने आपली सर्विस गमावली. यानंतर आगुतने आपली सर्विस राखताना ४-१ अशी निर्णायक आघाडी घेत वर्चस्व मिळवले. यानंतर कोणाचीही सर्विस भेदली गेली नाही आणि आगुतने नवव्या गेममध्ये आपली सर्विस राखताना पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये मेदवेदेवने झुंजार खेळ केला. परंतु, आगुतचा धडाका रोखण्यात त्याला अपयश आले. त्याचवेळी, सातव्या गेमदरम्यान मेदवेदेवने पायांच्या मांसपेशी ताणल्या गेल्याने वैद्यकिय उपचारासाठी टाइमआउट घेतला. ४-४ अशी बरोबरी असताना मेदवेदेवने आपली सर्विस गमावली. यानंतर आगुतने आपली सर्विस राखताना सामन्यासह जेतेपदावर नाव कोरले. (वृत्तसंस्था)४आपल्या पहिल्या एटीपी वर्ल्ड टूर जेतेपदाच्या अंतिम फेरीत खेळत असलेल्या मेदवेदेवने स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी केली. याजोरावर तो आपल्या जागतिक क्रमवारीत सुधारणा करु शकतो अशी आशा आहे. सध्या मेदवेदेव ९९व्या स्थानी आहे. ४आगुतने दुसऱ्यांदा चेन्नई ओपनची अंतिम फेरी गाठली होती. याआधी २०१३ साली त्याला यांको टिपसरेविचविरुध्द पराभूत झाल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.