शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

आदित्यचे निर्णायक विजेतेपद

By admin | Updated: June 23, 2015 01:51 IST

घाटकोपरचा इंटरनॅशनल मास्टर (आयएम) आदित्य उदेशी याने आपल्या लौकिकानुसार वर्चस्व राखताना सर्वाधिक ८ गुणांची कमाई करून नुकत्याच

मुंबई : घाटकोपरचा इंटरनॅशनल मास्टर (आयएम) आदित्य उदेशी याने आपल्या लौकिकानुसार वर्चस्व राखताना सर्वाधिक ८ गुणांची कमाई करून नुकत्याच पार पडलेल्या १८व्या वा.गो. वझे स्मृती बुद्धिबळ स्पर्धेचे दिमाखदार विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे आदित्यने बाजी मारताना गतविजेत्या राकेश कुलकर्णीला बकहोल गुणांच्या जोरावर पिछाडीवर टाकले.डॉ. प्रकाश वझे क्रीडा प्रतिष्ठान आणि मुंबई बुद्धिबळ संघटनेच्या संयुक्त विद्यमाने मुलुंड मराठा मंडळ सभागृहात पार पडलेल्या या स्पर्धेत सुरुवातीपासूनच आदित्यने विजयी धडाका लावताना विजेतेपदाच्या दिशेने कूच केली होती. त्याचवेळी गतविजेत्या राकेशनेदेखील विजयी घोडदौडीसह स्पर्धा चुरशीची केली. दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी ८ गुणांसह स्पर्धेत संयुक्तरीत्या वर्चस्व राखले होते. मात्र निर्णायक अखेरच्या सामन्यात आदित्यने सर्वाधिक ५५.२ बकहोल गुणांच्या आधारे बाजी मारून रोख ६ हजार रुपयांच्या बक्षिसावरही कब्जा केला. राकेशला ५२.५ बकहोल गुणांसह अखेर द्वितीय स्थानासह ३ हजार रुपयांच्या रोख पारितोषिकावर समाधान मानावे लागले. तसेच ठाण्याच्या अमरदीप बारटक्केने ७.५ गुणांच्या आधारे तृतीय स्थान पटकावले.