वसीम अक्रम जोड
By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST
विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाने नेहमीच पाकिस्तान संघावर वर्चस्व गाजविले आहे, याचे कारण अद्याप मला कळलेले नाही. हा लाखमोलाचा प्रश्न असून, त्याचे उत्तर अद्याप कुणाला सापडलेले नाही.
वसीम अक्रम जोड
विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाने नेहमीच पाकिस्तान संघावर वर्चस्व गाजविले आहे, याचे कारण अद्याप मला कळलेले नाही. हा लाखमोलाचा प्रश्न असून, त्याचे उत्तर अद्याप कुणाला सापडलेले नाही. १९९२ व १९९९ मध्ये अनुक्रमे सिडनी व मँचेस्टर येथे खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाला २२० धावांचे लक्ष्यही गाठता आले नव्हते. १९९६च्या लढतीत मी खेळलो नव्हतो. त्यानंतर २००३मध्ये आम्हाला पुन्हा एकदा पराभव स्वीकारावा लागला होता. माझी ती अखेरची स्पर्धा होती. सर्वसाधारण विचार करता, पाकिस्तान संघाची भारतीय संघाविरुद्धची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे; पण विश्वकप स्पर्धेत मात्र आम्हाला भारताविरुद्ध सातत्याने पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विक्रम हे मोडण्यासाठीच असतात. रविवारी असेच काही घडेल, अशी आशा आहे. मी हे केवळ पाकिस्तानी आहे म्हणून असे म्हणत नसून क्रिकेटचा एक जाणकार म्हणून मत व्यक्त करीत आहे. आमच्या भागतील प्रत्येक वाहिनी व वृत्तपत्र आम्हाला याची आठवण करून देतात. पाकिस्तान संघातील खेळाडूंवर याचे दडपण नसावे, अशी आशा आहे. भारत-पाक लढत म्हणजे उभय संघांतील खेळाडूंवर दडपण असणारच, हे नाकारता येत नाही. पत्रकार परिषदेत रोहित शर्माने वक्तव्य केले होते, की पाकिस्तान संघावर अधिक दडपण राहील; पण उभय संघांवर सारखेच दडपण राहणार आहे, हे मात्र खरे.कोट्यवधी चाहते या लढतीचा थरार अनुभवणार आहेत. भारत-पाक क्रिकेटची ही खासियत आहे. त्यामुळे उभय संघांदरम्यान क्रिकेट सामने होणे किती गरजेचे आहे, हे कळते. ०००