शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

ऑसी जोड

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

फिंचच्या खेळीत १२ चौकार व ३ षटकारांचा समावेश आहे, तर मॅक्सवेलने ११ चौकार ठोकले. फिंचने गृहमैदानावर पहिले शतक ठोकले. कर्णधार जॉर्ज बेलीने ६९ चेंडूंमध्ये ५५ धावांची खेळी केली. बेलीने फिंचसोबत चौथ्या विकेटसाठी १४६ धावांची भागीदारी केली. नियमित कर्णधार मायकल क्लार्कच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करणार्‍या बेलीने अर्धशतकी खेळीत ३ चौकार ठोकले.

फिंचच्या खेळीत १२ चौकार व ३ षटकारांचा समावेश आहे, तर मॅक्सवेलने ११ चौकार ठोकले. फिंचने गृहमैदानावर पहिले शतक ठोकले. कर्णधार जॉर्ज बेलीने ६९ चेंडूंमध्ये ५५ धावांची खेळी केली. बेलीने फिंचसोबत चौथ्या विकेटसाठी १४६ धावांची भागीदारी केली. नियमित कर्णधार मायकल क्लार्कच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करणार्‍या बेलीने अर्धशतकी खेळीत ३ चौकार ठोकले.
यापूर्वी तीन वेळा उपविजेतेपदावर समाधान मानणार्‍या इंग्लंडतर्फे स्टीव्हन फिनने ७१ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले, तर स्टुअर्ट ब्रॉडने २ बळी घेतले. फिनने अखेरच्या षटकातील अखेरच्या ३ चेंडूंवर ब्रॅड हॅडिन (३१), ग्लेन मॅक्सवेल (६६) आणि मिशेल जॉन्सन (०) यांना तंबूचा मार्ग दाखविला. फिंचला जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर ख्रिस व्होक्सने जीवदान दिले, त्या वेळी त्याने खातेही उघडले नव्हते. ब्रॉडने डेव्हिड वॉर्नर (२२) आणि शेन वॉटसन (०) यांना एकापाठोपाठ माघारी परतवून इंग्लंडला वर्चस्व गाजविण्याची संधी प्रदान केली. पण, त्यानंतर बेली व फिंच यांनी चौथ्या विकेटसाठी १४६ धावांची भागीदारी करून डाव सावरला. फिंच चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. फिंच मॉर्गनच्या अचूक फेकीवर बाद झाला. त्यानंतर बेली फिनच्या गोलंदाजीवर बाद झाला.
इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. मोईन अली (१०) व गॅरी बॅलन्स (१०) यांना मोठी खेळी करता आली नाही. त्यानंतर इयान बेल (३६) व जो रुट (५) यांना मार्शने १४व्या षटकात एकापाठोपाठ माघारी परतवून ऑस्ट्रेलियाला वर्चस्व मिळवून दिले. इयोन मॉर्गनचा अडसर मार्शने दूर केला. धावफलकावर ७३ धावांची नोंद असताना इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला होता. टेलर व व्होक्स यांनी सातव्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. व्होक्स (३७ धावा, ४२ चेंडू) बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांना विशेष छाप पाडता आली नाही. टेलरने ९० चेंडूंमध्ये नाबाद ९८ धावांची खेळी केली. त्यात ११ चौकार व २ षटकारांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
०००