शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

ऑसी जोड

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

फिंचच्या खेळीत १२ चौकार व ३ षटकारांचा समावेश आहे, तर मॅक्सवेलने ११ चौकार ठोकले. फिंचने गृहमैदानावर पहिले शतक ठोकले. कर्णधार जॉर्ज बेलीने ६९ चेंडूंमध्ये ५५ धावांची खेळी केली. बेलीने फिंचसोबत चौथ्या विकेटसाठी १४६ धावांची भागीदारी केली. नियमित कर्णधार मायकल क्लार्कच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करणाऱ्या बेलीने अर्धशतकी खेळीत तीन चौकार ठोकले.

फिंचच्या खेळीत १२ चौकार व ३ षटकारांचा समावेश आहे, तर मॅक्सवेलने ११ चौकार ठोकले. फिंचने गृहमैदानावर पहिले शतक ठोकले. कर्णधार जॉर्ज बेलीने ६९ चेंडूंमध्ये ५५ धावांची खेळी केली. बेलीने फिंचसोबत चौथ्या विकेटसाठी १४६ धावांची भागीदारी केली. नियमित कर्णधार मायकल क्लार्कच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करणाऱ्या बेलीने अर्धशतकी खेळीत तीन चौकार ठोकले.
यापूर्वी तीनवेळा उपविजेतेपदावर समाधान मानणाऱ्या इंग्लंडतर्फे स्टिव्हन फिनने ७१ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले, तर स्टुअर्ट ब्रॉडने २ बळी घेतले. फिनने अखेरच्या षटकातील अखेरच्या तीन चेंडूवर ब्रॅड हॅडिन (३१), ग्लेन मॅक्सवेल (६६) आणि मिशेल जॉन्सन (००) यांना तंबूचा मार्ग दाखविला. फिंचला जेम्स ॲन्डरसनच्या गोलंदाजीवर ख्रिस व्होक्सने जीवदान दिले, त्यावेळी त्याने खातेही उघडले नव्हते. ब्रॉडने डेव्हिड वॉर्नर (२२) आणि शेन वॉटसन (००) यांना एकापाठोपाठ माघारी परतवत, इंग्लंडला वर्चस्व गाजविण्याची संधी प्रदान केली. पण त्यानंतर बेली व फिंच यांनी चौथ्या विकेटसाठी १४६ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. फिंच चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. फिंच मॉर्गनच्या अचूक फेकीवर बाद झाला. त्यानंतर बेली फिनच्या गोलंदाजीवर बाद झाला.
इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. मोईन अली (१०) व गॅरी बॅलन्स (१०) यांना मोठी खेळी करता आली नाही. त्यानंतर इयान बेल (३६) व जो रुट (५) यांना मार्शने १४ व्या षटकात एकापाठोपाठ माघारी परतवत ऑस्ट्रेलियाला वर्चस्व मिळवून दिले. इयोन मॉर्गनचा अडसर मार्शने दूर केला. धावफलकावर ७३ धावांची नोंद असताना इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला होता. टेलर व व्होक्स यांनी सातव्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. व्होक्स (३७ धावा, ४२ चेंडू) बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांना विशेष छाप सोडता आली नाही. टेलरने ९० चेंडूंमध्ये नाबाद ९८ धावांची खेळी केली. त्यात ११ चौकार व २ षटकारांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)