शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

अभिषेकने मारला ‘सुवर्ण’तीर

By admin | Updated: August 15, 2015 23:51 IST

अभिषेक वर्मा याने भारतीयांना स्वातंत्र्यदिनाची अनोखी भेट देताना आर्चेरी (तिरंदाजी) वर्ल्डकप स्पर्धेच्या पुरुषांच्या कम्पाऊंड प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली. विशेष म्हणजे एकदिवसआधी

वॉकलॉ : अभिषेक वर्मा याने भारतीयांना स्वातंत्र्यदिनाची अनोखी भेट देताना आर्चेरी (तिरंदाजी) वर्ल्डकप स्पर्धेच्या पुरुषांच्या कम्पाऊंड प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली. विशेष म्हणजे एकदिवसआधी सांघिक कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत अपयशी ठरलेल्या अभिषेकने वैयक्तिक प्रकारामध्ये सगळी कसर भरुन काढताना भारतासाठी सुवर्ण जिंकले.जागतिक क्रमवारीत १८व्या स्थानी असलेल्या अभिषेकने अंतिम सामन्यात आपला सर्वोत्तम खेळ करताना इराणच्या इस्माईल इबादीला १४८-१४५ झुंजाररीत्या नमवले. या विजयासह अभिषेकने गतवर्षी आशियाई स्पर्धेत झालेल्या इस्माईलविरुध्द झालेल्या अंतिम फेरीतील पराभवाचा वचपा देखील काढला. पुर्णपणे वर्चस्व राखलेल्या या सामन्यात अभिषेक एकूण १३वेळा अचूक १० गुणांचा वेध घेतला. यामुळे इस्माईलवरील दबाव आणखी वाढत गेले. या सामन्यात धमाकेदार सुरुवात करताना इस्माईलने पहिल्या गेममध्ये नोंदवलेल्या २८ गुणांना जोरदार उत्तर देताना ३० गुणांचा वेध घेतला. येथूनच घेतलेली आघाडी त्याने शेवटपर्यंत टिकवून ठेवली. यानंतर त्याने दोनवेळा १० गुणांचा वेध घेताना एकदा नऊ गुण घेत तीन गुणांनी आघाडी घेतली.तसेच इस्माईलने देखील यावेळी कडवी झुंज देताना अभिषेकला गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र अचूक तिरंदाजीचा धडाका लावलेल्या अभिषेकपुढे त्याचा अखेरपर्यंत निभाव लागला नाही. इंचिओन आशियाई स्पर्धेच्या कम्पाऊंड प्रकाराच्या अंतिम सामन्यात अभिषेकला इस्माईलविरुध्द १४१-१४५ असा पराभव पत्करावा लागला होता. (वृत्तसंस्था)