शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

खेळाडूंना ३८ कोटींचा ‘फटका’

By admin | Updated: March 4, 2015 02:24 IST

२०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये सामन्यांच्या प्रसारण हक्क विक्रीमध्ये बीसीसीआयला कमी नफा झाल्याचा परिणाम खेळाडूंच्या मिळकतीवरही होऊन त्यांना ३८ कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

मुंबई : २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये सामन्यांच्या प्रसारण हक्क विक्रीमध्ये बीसीसीआयला कमी नफा झाल्याचा परिणाम खेळाडूंच्या मिळकतीवरही होऊन त्यांना ३८ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. या आर्थिक वर्षात ५१६ कोटी रुपये प्रसारण हक्कातून बीसीसीआयला मिळाले होते, तर त्यापूर्वीच्या वर्षी ५५१ कोटी रुपयांची मिळकत झाली होती, अशी माहिती कोशाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांनी दिली.चौधरी यांनी सांगितले, की मीडियाचे सर्व हक्क विक्रीतूनही कमी नफा मिळाला आहे. २०१२-१३ या आर्थिक वर्षात ७७४ कोटी रुपये यातून मिळाले होते; पण २०१३-१४ वर्षात हा आकडा ४१९ रुपयांवर आला. याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय संघ या वर्षात मायदेशात अतिशय कमी सामने खेळला आहे.याउलट, आयपीएलमधून मिळणाऱ्या नफ्यात वाढ झाली आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये आयपीएलला १,१९४ कोटी रुपये महसूल मिळाला होता. त्याच्या अगोदरच्या वर्षी हाच आकडा ८९२ कोटी रुपये इतका होता. २०१३-१४ या आर्थिक वर्षात बीसीसीआयने चॅम्पियन्स लीगमधून ३२७ कोटी रुपयांची कमाई केली. बीसीसीआयला आयसीसीकडून ३३ कोटींचा वाटा मिळाला, तर व्याजातून १२० कोटींचे उत्पन्न मिळाले असल्याचे चौधरी यांनी सांगितले.कोची : आयपीएलला अधिक पारदर्शी बनविण्यासाठी संघांच्या ताळेबंदावर बीसीसीआयची करडी नजर असेल, अशी माहिती बीसीसीआयचे नवनियुक्त उपाध्यक्ष आणि आयपीएल संचालन परिषदेचे सदस्य टी. सी. मॅथ्यू यांनी सांगितले. एर्नाकुलम प्रेस क्लबमध्ये पत्रकारांशी बोलताना मॅथ्यू म्हणाले, ‘‘आयपीएल प्रमोटर्सच्या शेअर्स हस्तांतराच्या प्रक्रियेला सखोल चौकशीनंतरच मंजुरी दिली जाईल. आयपीएल संघावर कोण जास्त गुंतवणूक करीत आहे। त्याचे हस्तांतर कसे झाले आहे? या सर्वांचा विचार केला जाईल. आयपीएलला भ्रष्टाचारमुक्त बनविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असेही ते म्हणाले.आयपीएलच्या ४ संघांना नोटीस मुंबई : द. आफ्रिकेत २००९मध्ये झालेल्या दुसऱ्या आयपीएल दरम्यान विदेशी चलन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रवर्तन निदेशालयाने चार संघांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे़ वृत्तसंस्थेस एका अधिकाऱ्याने सांगितले, की किंग्ज इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज या संघांच्या मालकांना नोटिसा जारी करण्यात आल्या़ अधिकाऱ्याने सांगितले, की या संघांनी आपल्या मालकीच्या कंपन्यांमार्फत विदेशात रोख रकमेच्या हस्तांतरामध्ये आरबीआयच्या नियमांचे उल्लघन केल्याने सदर नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत.(वृत्तसंस्था)श्रीसंतची मदत करू जर न्यायालयाने श्रीसंतला स्पॉटफिक्सिंग प्रकरणातून निर्दोष मुक्त केले, तर मैदानावर पुनरागमन करण्यासाठी त्याला आम्ही पूर्णपणे मदत करू. मी कालच श्रीसंतशी बोललो आहे. त्याला मी पूर्ण सहकार्य करीन.-टी. सी. मॅथ्यू