शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

२००३ - ऑस्ट्रेलियाच अव्वल

By admin | Updated: February 15, 2015 16:07 IST

आठव्या पर्वात विश्वचषकातील संघांची संख्या १२ वरुन १४ वर नेण्यात आली.

आयसीसी वर्ल्डकपचे आठवे पर्व ९ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे या देशांमध्ये पार पडले. आठव्या पर्वात विश्वचषकातील संघांची संख्या १२ वरुन १४ वर नेण्यात आली. कसोटी खेळणा-या कॅनडा, हॉलंड आणि नामिबीया या देशांना वर्ल्डकपमध्ये स्थान देण्यात आले. मात्र नवीन देशांना संधी देण्याच्या प्रयत्नात या विश्वचषकात अनेक एकतर्फी लढती पाहायला मिळाल्या. 
 
आठव्या पर्वात इंग्लंडने झिम्बाब्वेमध्ये खेळण्यास नकार दिला. तर यजमान दक्षिण आफ्रिका पुन्हा एकदा विश्वचषकात अपयशी ठरले. केनियाने क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली. सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज अॅडम गिलख्रिस्टने पंचांनी नाबादचा चुकीचा निर्णय देऊनही स्वतःहून मैदानातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत खेळाडूवृत्तीचे दर्शन घडवले. जोहान्सबर्गमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने होते. भारतीय संघ १९८३ ची पुनरावृत्ती करणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. पण ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉंटिगच्या धडाकेबाज १४० धावांच्या खेळीन ऑस्ट्रेलियाने अवघे २ गडी गमावत ५० षटकांत ३५९ धावांचा डोंगर उभा केला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी कोसळली. 
भारताने सर्वगडी गमावत २३९ धावाच केल्या. विरेंदर सेहवागचा अपवाद वगळता एकही भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर तग धरु शकला नाही. 
 
 
हा खेळ आकड्यांचा
एकूण सामने - ५४ 
एकूण धावा - २०, ४४१
सर्वाधिक धावा करणारा फलंदाज - सचिन तेंडुलकर - भारत - (११ सामन्यात ६७३ धावा)
सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज - चामिंडा वास - श्रीलंका (१० सामन्यात २३ विकेट्स)