शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

१९९२ - नवे नियम, नवा विजेता

By admin | Updated: February 15, 2015 15:54 IST

पांढरा चेंडू, रंगीत कपडे, ब्लॅक स्क्रीनचा वापर आणि डे नाईट सामने असे नवनवीन प्रयोग या विश्वचषकात करण्यात आल्याने हे विश्वचषक क्रिकेटमध्ये रंगीत दिवस आणणारे ठरले.

पाचवे विश्वचषक ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये २२ फेब्रुवारी ते २५ मार्च या कालवधीत पार पडले. या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला होता. याशिवाय पांढरा चेंडू, रंगीत कपडे, ब्लॅक स्क्रीनचा वापर आणि डे नाईट सामने असे नवनवीन प्रयोग या विश्वचषकात करण्यात आल्याने हे विश्वचषक क्रिकेटमध्ये रंगीत दिवस आणणारे ठरले. याशिवाय पहिल्या १५ षटकांमध्ये क्षेत्ररचनेवर निर्बंध घालण्याचा नवा नियमही या विश्वचषकात लागू झाला. या नव्या नियमामुळे वन डे सामन्यांमधील रोमांच आणखी वाढला.  
पाचव्या विश्वचषकात ९ संघ सहभागी असल्याने तब्बल ३६ सामने खेळवण्यात आले. यातून चार सर्वोत्तम संघांची सेमीफायनल व त्यामधील विजेत्यांमध्ये अंतिम लढत असे विश्वचषकाचे फॉर्मेट होते. मेलबर्न क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडचा २२ धावांनी पराभव केला व इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाक संघाने प्रथमच विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. 
 
हा खेळ आकड्यांचा
एकूण सामने - ३९
एकूण धावा - १५, १०७
एकूण विकेट्स - ५१४ 
सर्वाधिक धावा करणारा फलंदाज - मार्टिन क्रो - न्यूझीलंड- (९ सामन्यांमध्ये ४५६ धावा)
सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज - वासिम अक्रम - पाकिस्तान (१० सामन्यांमध्ये १८ विकेट्स)