शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

१९७५ - पहिला विश्वचषक

By admin | Updated: February 15, 2015 15:07 IST

मर्यादीत षटकांच्या सामन्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळू लागल्याने १९७५ मध्ये इंग्लंड येथे पहिल्या वहिल्या विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते.

मर्यादीत षटकांच्या सामन्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळू लागल्याने १९७५ मध्ये इंग्लंड येथे पहिल्या वहिल्या विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते.  इंग्लंडमधील क्रिकेट चाहत्यांची लक्षणीय संख्या, आयोजन क्षमता व स्टेडियम या सर्व बाबींचा विचार करुन इंग्लंडमध्ये विश्वचषक आयोजित करण्यावर शिक्कामोर्तब झाले. ७ ते २१ जून १९७५ या कालावधीत पहिला विश्वचषक रंगला. 
पहिल्या विश्वचषकात एकूण ८ संघ सहभागी झाले होते. या विश्वचषकात वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड हे सहा कसोटी सामने खेळणारे देश सहभागी होते. याशिवाय पूर्व आफ्रिका व श्रीलंका या देशांना विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली. (हे दोन्ही १९८२ पर्यंत कसोटी क्रिकेटसाठी पात्र ठरले नव्हते.) या विश्वचषकात ६० षटकांचे सामने खेळवण्यात आले होते.
पहिल्या विश्वचषकात आठ संघांना दोन गटात विभागण्यात आले होते. विश्वचषकात एकूण १५ सामने पार पडले. अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजचे फलंदाज क्लाइव्ह लॉइड यांच्या ८५ चेंडूत १०२ धावांच्या धडाकेबाज खेळीने वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाचा १७ धावांनी पराभव करत पहिल्या विश्वचषकावर नाव कोरले. लॉर्ड्स मैदानावर हा अंतिम सामना रंगला होता. 
 
हा खेळ आकड्यांचा
 
एकूण धावा - ६,१६२
एकूण विकेट्स - २०८ 
सर्वाधिक धावा करणारा फलंदाज - ग्लेन टर्नर - न्यूझीलंड ( चार सामन्यांमध्ये ३३३ धावा)
सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज - गॅरी गिल्मर - ऑस्ट्रेलिया (२ सामन्यांमध्ये ११ विकेट्स)