मान्यतेची फाईल धूळ खात पडून : क्रीडा संचालकांना स्वाक्षरी करण्यास वेळ नाही
किशोर बागडे - नागपूर
अपंग खेळाडूंच्या क्रीडा संघटनेला राज्य क्रीडा परिषदेची मान्यता आणि नोकरीमध्ये हवे असलेले 5 टक्के आरक्षण या दोन्ही बाबींची पूर्तता होत नसल्याच्या कारणांवरून विविध शासकीय कार्यालयांत नोकरीत लागलेल्या राज्यातील 10 अपंग खेळाडूंना नोकरी गमावण्याची वेळ आली.
अपंग क्रीडा क्षेत्रत मान्यताप्राप्त असलेल्या पॅरा अॅथलेटिक असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (पाम) या संघटनेने मान्यतेसाठी नोव्हेंबर 2क्13मध्ये आवश्यक दस्तऐवजांसह अर्ज सादर केला होता. राज्य शासनाने मान्यता प्रदान केली आणि अंतिम कारवाईसाठी पुण्यातील क्रीडा संचालकांच्या कार्यालयाकडे फाईल पाठविली. तेव्हापासून ही फाईल तशीच धूळ खात आहे. क्रीडा संचालकांकडे स्वाक्षरीसाठी मुळीच वेळ नसल्याने राज्यातील अपंग क्रीडापटूंना लागलेल्या नोक:या घालविण्याची वेळ आली आहे.
संघटनेचे सचिव प्रवीण उघडे यांनी क्रीडा संचालनालयाशी संपर्क साधला तेव्हा आयुक्त पंकजकुमार हे जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक डय़ुटीवर गेल्याचे उत्तर मिळाले. त्यांच्या
अपरोक्ष कुणी दुसरा अधिकारी
निर्णय घेऊ शकत नाही, अशीही सबब दिली.
दरम्यान, अपंग खेळाडूंनी केलेल्या कामगिरीची प्रमाणपत्रे पडताळणीसाठी असल्याने आणि त्यांची नोकरीविषयक अर्हता मान्यतेसंबंधी दस्तऐवजांवर विसंबून असल्याने नोकरीत लागलेल्या सर्व खेळाडूंना त्यांच्या विभागाने निर्धारित कालावधीत योग्यता सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याच्या कारणावरून नोकरीतून कमी केले.