शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

झेनिथच्या कामगार वसाहतीची दुरवस्था

By admin | Updated: February 19, 2016 02:31 IST

पाइपचे उत्पादन करणाऱ्या बिर्ला उद्योग समूहाच्या झेनिथ स्टील कंपनी व्यवस्थापनाने कुठलीही कल्पना न देता तीन वर्षांपूर्वी अचानक टाळेबंदीचा निर्णय घेतला

खोपोली : पाइपचे उत्पादन करणाऱ्या बिर्ला उद्योग समूहाच्या झेनिथ स्टील कंपनी व्यवस्थापनाने कुठलीही कल्पना न देता तीन वर्षांपूर्वी अचानक टाळेबंदीचा निर्णय घेतला. गेल्या तीन वर्षात व्यवस्थापनाने कामगारांना वाऱ्यावर सोडल्याने कामगारांची अवस्था बिकट आहे. आयुष्यभर रक्त आटवल्यानंतरही पदरात काहीच न पडल्याने कधीतरी न्याय मिळेल या अपेक्षेत अनेक कामगार आजही कुटुंबासह कंपनीच्या वसाहतीमध्ये राहत आहेत. या इमारतींची दुरवस्था झाली असून कोणत्याही क्षणी इमारत कोसळण्याची भीती असल्याने कामगारांना जीव मुठीत घेऊन दिवस काढावे लागत आहेत.झेनिथ स्टील हा कारखाना एकेकाळी खोपोलीच्या वैभवात भर घालण्याचे काम करत होता. हजारो कामगार आणि खोपोलीची बाजारपेठ या कारखान्यावर अवलंबून होती. २०१३ मध्ये अचानक व्यवस्थापनाने कामगारांना कुठलीही कल्पना न देता कारखाना बंद करण्याचा निर्णय घेतला. कामगारांनी या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. कंपनी बंद झाल्यानंतर जायचे कुठे? खायचे काय, असा प्रश्न कामगारांसमोर उभा ठाकला होता. त्यामुळे अनेक कामगारांनी कंपनीच्या वसाहतीमध्ये राहणे पसंत केले. अनेक कामगार मिळेल ते काम करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.येथे वीज नसल्याने पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला असून परीक्षा सुरु असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. कामगार सध्या ज्या वसाहतींमध्ये राहत आहेत त्या इमारती तीस-चाळीस वर्षांपूर्वी बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे या इमारतींची दुरवस्था झाली असून स्लॅब, प्लॅस्टर जागोजागी कोसळल्याने इमारतीमध्ये राहणे धोकादायक झाले आहे. इमारतीच्या खिडक्या व दरवाजेही तुटले आहेत. त्यामुळे कामगारांना कुटुंबासह जीव मुठीत घेवून दिवस काढावे लागत आहेत. कामगार राहत असलेल्या चाळींच्या शेजारी गवताचे जंगल झाले असून तुटलेले छप्पर, पडलेल्या भिंती, तुंबलेली गटारे यामध्ये कामगार कसेबसे दिवस काढत आहेत. भिंती तुटल्याने कामगारांनी घरांना पत्रे लावले आहेत. तर पावसापासून रक्षण व्हावे म्हणून अनेकांनी छपरावर प्लास्टिकच्या कागदाचे आच्छादन टाकले आहे.हा सर्व परिसर खोपोली शहरापासून असून या रहिवासी इमारतींच्या बाजूला सर्व जंगलभाग आहे. त्यामुळे या ठिकाणी कामगार व त्यांच्या कुटुंबाचे जीणे धोकादायक आहे. झेनिथ स्टीलच्या व्यवस्थापनाला कामगारांकडे लक्ष द्यायला वेळच नसल्याने येथील भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)व्यवस्थापनाने कुठलीही कल्पना न देता अचानक टाळेबंदी केल्याने आमच्या समोर उदरिनर्वाहाचा प्रश्न असताना आम्ही राहत असलेल्या घरांची दुरवस्था झाली आहे. इमारत कधीही कोसळण्याची भीती आहे. अनेक ठिकाणी स्लॅब कोसळत आहे तर भिंतीनाही तडे गेल्याने आम्ही जीव मुठीत घेवून कुटुंबासह राहत आहोत. - राजू मोहिते, कर्मचारी, झेनिथ स्टील