शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

तू धाव पुढे...!

By admin | Updated: August 24, 2015 02:32 IST

प्रचंड रंगमंच, त्याला ‘खाकी’ वर्दीची तटबंदी, सराव करणारे स्पर्धक आणि महिला बॅण्ड पथक अशा तयारीने रविवारची पहाट सजली होती. ४० पोलीस अधिकारी,

 ठाणे, प्रचंड रंगमंच, त्याला ‘खाकी’ वर्दीची तटबंदी, सराव करणारे स्पर्धक आणि महिला बॅण्ड पथक अशा तयारीने रविवारची पहाट सजली होती. ४० पोलीस अधिकारी, ४०० कर्मचारी, १०,००० संत निरंकारी संस्थेचे स्वयंसेवक असा फौजफाटा स्पर्धकांसाठी सज्ज होता. स्पर्धक, कलाकारांसह राजकारणातील तज्ज्ञ मंडळींनीदेखील स्पर्धेला हजेरी लावली. संत निरंकारी सेवा दल महिला बॅण्ड पथक आणि संत निरंकारी ब्रॉस पथक यांच्या तालावर नकळत उपस्थितांनी ठेका धरला. महिलांची स्पर्धा संपण्याच्या ठिकाणी (हिरानंदानी इस्टेट सर्कल) स्थानिक नृत्य कलाकारांनी दर्जेदार सादरीकरणही केले.ठाणे वर्षा मॅरेथॉनचे आयोजन अफलातून होते. चांगल्या स्पर्धकामुंळे मॅरेथॉनमध्ये धावायला मजा आली. विविध चेकपोस्टवर ठाणेकरांच्या चीअर्सने धावण्यासाठी ऊर्जा मिळत होती. या विजयाचे मानकरी माझे पती सचिन आणि वडील मारुती हेदेखील आहे. त्यांनी वेळोवेळी दिलेल्या पाठिंब्यामुळे मी जिंकू शकले, असे महिला गटातील उपविजेती नीलम कदम-राजपूत हिने सांगितले. मुंबई मॅरेथॉनमध्ये (४२ किमी) सलग तीन वर्षे दुसरा क्रमांक पटकावणारी विजयमाला पाटीलला यंदाच्या मॅरेथॉनमध्ये तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. पश्चिम रेल्वेमध्ये कार्यरत असलेली विजयमाला पाटील यंदा मुंबई मॅरेथॉनमध्ये अव्वल क्रमांक मिळवण्याच्या हेतूने धावणार आहे. मायक्रो चिपने मॅरेथॉनला मिळाला आंतरराष्ट्रीय दर्जायंदाच्या २६ व्या ठाणे महापौर मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना आयोजकांनी मोफत मायक्रो चिप दिली होती. यामुळे वेळेची अचूक नोंद झाली असून स्पर्धकांना यापुढे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जमेची बाजू झाली आहे.दोन वर्षांपासून ही चिप स्पर्धकांना देण्यासाठी मनपाकडून प्रयत्न होत होते. मात्र, काही कारणास्तव ती गेल्या वर्षीही स्पर्धकांना मिळाली नव्हती. यंदा मात्र पुरुषांच्या २१ किमीच्या खुल्या स्पर्धेतील २६७ आणि महिलांच्या १५ किमीच्या ५६ स्पर्धकांना या चिप्सचे वाटप केले होते. अशा ५०० चिप्ससाठी प्रायोजकांमार्फत अडीच लाखांचा खर्च केल्याचे उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली. ही चिप्स स्पर्धकांच्या छातीवरील बॅजवर लावली होती.