शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

कुस्ती खेळाडूंची फसवणूक सुरूच

By admin | Updated: March 2, 2016 02:20 IST

गोल्फ कोर्ससह क्रिकेट व फुटबॉलसाठी मैदान उपलब्ध करून देणाऱ्या सिडको व महापालिका कुस्ती खेळाकडे दुर्लक्ष करत आहे

नवी मुंबई : गोल्फ कोर्ससह क्रिकेट व फुटबॉलसाठी मैदान उपलब्ध करून देणाऱ्या सिडको व महापालिका कुस्ती खेळाकडे दुर्लक्ष करत आहे. २००५ पासून कुस्तीचा अत्याधुनिक आखाडा उभारण्याचे फक्त आश्वासन दिले जात आहे. परंतु प्रत्यक्षात जागा उपलब्ध करून दिली जात नाही. मैदानाअभावी शहरातील १०० पेक्षा जास्त कुस्ती खेळाडूंचे करिअर उद्ध्वस्त झाले आहे. कोपरखैरणेमधील रा. फ. नाईक विद्यालयाच्या मैदानावर २००५ मध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी नवी मुंबईमध्ये एक वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा कुस्तीचा आखाडा उभारण्याचे आश्वासन तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक, सिडको व महापालिकेने दिले होते. याच मैदानामध्ये नुकतीच महापौर केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण स्पर्धेमध्येही महापौर सुधाकर सोनावणे यांनी नवी मुंबईमध्ये कुस्तीचा आखाडा उभारण्याचे सूतोवाच केले आहे. गत ११ वर्षांपासून प्रत्येक वर्षी कुस्ती खेळाडू, कुस्ती शौकीन व संघटनांचे पदाधिकाऱ्यांमध्ये आता या आश्वासनामुळे असंतोष निर्माण होवू लागला आहे. देशाला वैयक्तिक खेळात पहिले आॅलिंपिक पदक मिळवून देणाऱ्या कुस्तीसाठी मात्र छोटासा आखाडा तयार करण्यासाठी जागा दिली जात नाही. सिडको व महापालिका प्रशासनाने कुस्ती खेळ व खेळाडूंची उपेक्षाच केली आहे. कुस्तीमध्ये करिअर करण्याची जिद्द असणाऱ्या खेळाडूंना पुणे, कोल्हापूरला जावे लागत आहे. ज्यांना इतर शहरांमध्ये जाणे शक्य नाही त्यांना कुस्ती खेळच बंद करावा लागत आहे. आतापर्यंत १०० पेक्षा जास्त खेळाडूंचे करिअर आखाडा नसल्याने उद्ध्वस्त झाले आहे. राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते खेळाडू कृष्णा रासकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ट्रक टर्मिनलमध्ये मोकळ्या जागेवर आखाडा तयार करून कुस्तीचा सराव करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेला आखाडा पावसाळा आला की बंद करावा लागतो. पावसाळा संपला की लाखो रूपये खर्च करून पुन्हा आखाडा तयार करावा लागत आहे. खेळाडूंना पिण्यासाठी पाणीही उपलब्ध होत नाही. सराव झाल्यानंतर मातीने भरलेले अंग धुण्यासाठीही घरी जावे लागते. डासांचा उपद्रवामुळे खेळाडूंचे आरोग्य धोक्यात आले आहे. कुस्ती खेळाचा प्रचार करण्यासाठी परिश्रम करणारे सम्राट स्पोर्ट अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष बापू उणावणे यांनी नेरूळ सेक्टर ६ मधील शुश्रूषा हॉस्पिटलला लागून असलेल्या भूखंडावर एक वर्षापूर्वी आखाडा तयार केला होता. परंतु सदर आखाडा सिडको अधिकाऱ्यांनी बंद केला. या भूखंडाचा वापर आता कचरा टाकण्यासाठी होत आहे. (प्रतिनिधी)१ मार्च २०१५ मध्ये नेरूळमध्ये मोकळ्या भूखंडावर तात्पुरत्या स्वरूपात कुस्तीचा आखाडा तयार केला होता. २५ कुस्तीपटू तेथे सराव करत होते. परंतु सिडकोने जूनमध्ये पावसाळी शेडला परवानगी नाकारून आखाडा बंद करण्यास भाग पाडले. सिडकोच्या पायऱ्या झिजवूनही आखाड्यासाठी जागा दिली जात नाही. यामुळे आता कुस्ती खेळाडूंना आंदोलन करण्याशिवाय दुसरा मार्ग राहिलेला नाही. - बापू उणावणे, अध्यक्ष, सम्राट स्पोर्ट क्लब