शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

‘झेनिथ’चे कामगार १५ दिवस अंधारात

By admin | Updated: February 17, 2016 02:16 IST

झेनिथ कंपनीने विजेचे बिल न भरल्याने कंपनीत राहणाऱ्या ५० कुटुंबांवर अंधारात राहायची वेळ आली आहे. १० वी आणि १२ वीच्या परीक्षा तोंडावर आल्या असून, वीज नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मेणबत्ती

खालापूर : झेनिथ कंपनीने विजेचे बिल न भरल्याने कंपनीत राहणाऱ्या ५० कुटुंबांवर अंधारात राहायची वेळ आली आहे. १० वी आणि १२ वीच्या परीक्षा तोंडावर आल्या असून, वीज नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मेणबत्ती, दिव्याच्या उजेडात अभ्यास करावा लागत आहे. १५ दिवसांपासून येथील वीजपुरवठा खंडित असून, कंपनी बंद झाल्यानंतर व्यवस्थापनाने कामगारांना वाऱ्यावर सोडले आहे. कंपनी बंद केल्यानंतर झेनिथच्या व्यवस्थापनाला मोकळ्या जागेत गृहप्रकल्प उभा करायचा असल्याने कंपनीच्या आवारात राहणाऱ्या कामगारांनी घरे रिकामी करावीत, म्हणून झेनिथ कंपनीने जाणीवपूर्वक विजेचे बिल भरले नसल्याचा आरोप येथील रहिवाशांकडून केला जात आहे.विहारी परिसरात पाइपचे उत्पादन करणाऱ्या बिर्ला उद्योग समूहाचा झेनिथ स्टील हा कारखाना २०१३ मध्ये व्यवस्थापनाने कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक बंद केला. यामुळे कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. कारखाना बंद झाला त्यावेळी कामगार व कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने कंपनीच्या आवारात असलेल्या कॉलनीमध्ये राहत होते. कारखाना सुरू होण्याची आशा संपुष्टात आल्यानंतर अनेक कामगारांनी बाहेरचा रस्ता धरला, मात्र परिस्थिती नाजूक असलेले ५० हून अधिक कामगार कुटुंबासह आजही कंपनीच्या कॉलनीमध्ये वास्तव्याला आहेत.झेनिथ व्यवस्थापनाने टाळेबंदी जाहीर केल्यानंतर आजवर कामगारांची कुठल्याही प्रकारची थकीत देणी दिलेली नाहीत. त्यामुळे देणी मिळेपर्यंत कंपनीतून न जाण्याचा निर्धार या ठिकाणी राहत असलेल्या कामगारांनी केला आहे. झेनिथच्या व्यवस्थापनाला मात्र सर्व जागा मोकळी करून भव्य गृहप्रकल्प उभा करायचा आहे. कंपनीत काही कामगार राहत असल्याने गृहप्रकल्प उभा करायला अडचणी येत असल्याने व्यवस्थापनाने जाणीवपूर्वक वीज बिल भरले नाही, असा आरोप कामगारांकडून केला जात आहे. कामगारांनी वीज वितरण कंपनी व पोलिसांकडेही तक्र ार केली आहे.झेनिथ व्यवस्थापनाने सुमारे २० लाख रुपयांचे बिल भरलेले नाही. व्यवस्थापनाला याबाबत अनेकदा नोटीस दिल्यानंतरही दखल न घेतल्याने वीजपुरवठा खंडित केला आहे. कंपनीने थकलेल्या बिलाची रक्कम जमा केल्यानंतर तातडीने वीजपुरवठा पूर्ववत होईल.- विशाल नांदगावे, उप कार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी, खोपोली