शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

बेलापूरमधील पादचारी पुलाचे काम सुरू

By admin | Updated: February 25, 2017 03:20 IST

गेली कित्येक वर्षे रखडलेल्या आयकर कॉलनी ते बेलापूर पादचारी पुलाचे काम तत्काळ पूर्ण करावे यासाठी रेल्वेची परवानगी मिळावी यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करत अखेर

नवी मुंबई : गेली कित्येक वर्षे रखडलेल्या आयकर कॉलनी ते बेलापूर पादचारी पुलाचे काम तत्काळ पूर्ण करावे यासाठी रेल्वेची परवानगी मिळावी यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करत अखेर या कामाला सुरुवात झाली आहे. गेल्या महासभेत स्थानिक नगरसेविका सरोज पाटील यांनी लवकरात लवकर काम सुरू करण्याची मागणी केली होती. आयकर कॉलनीतील राहिवाशांना बेलापूर गावात जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडण्यासारखा जीवघेणा मार्ग अवलंबवावा लागत असून या पादचारी पुलामुळे नागरिकांची अडचण दूर केली जाणार आहे.विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरिता तसेच आयकर कॉलनीतील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीकरिता रेल्वे रूळ ओलांडावा लागतो. हा जीवघेणा मार्ग ओलांडण्याशिवाय पर्याय नसून प्रशासनही याकडे गांभीर्याने लक्ष घालत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. याठिकाणी रेल्वे रूळ ओलांडताना अनेक अपघात घडल्याचेही परिसरातील नागरिकांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून पादचारी पुलाचे बांधकाम रखडले होते. मात्र, आता लवकरच या पुलाचे काम पूर्ण केले जाईल, अशी प्रतिक्रिया महापौर सुधाकर सोनावणे यांनी दिली. मुंबई येथील मध्य रेल्वेच्या मुख्यालयात यासंदर्भात बैठकीचे आयोजन करून या प्रश्नावर चर्चा करण्यात आली होती. प्रवाशांच्या सुरक्षेकरिता स्थानकाच्या एका बाजूला कुंपण लावण्यात आले असून दुसऱ्या बाजूसही कुंपण घातले जाणार आहे. (प्रतिनिधी)