शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

आंबोली कालव्याचे काम अद्याप रखडले

By admin | Updated: May 8, 2017 06:29 IST

राज्यभर ‘जलयुक्त शिवार’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असून अधिकाधिक जमीन पाण्याखाली आणून शेतकऱ्यांचे मनोधैर्य

लोकमत न्यूज नेटवर्कमुरुड जंजिरा : राज्यभर ‘जलयुक्त शिवार’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असून अधिकाधिक जमीन पाण्याखाली आणून शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्याचे शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. तथापि, मुरुड तालुक्यातील आंबोली धरणावर अवलंबून असलेल्या उजव्या व डाव्या तीर कालव्याचे काम तब्बल दोन वर्षांपासून बंद पडल्याने धरण क्षेत्रातल्या हजारो शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी न मिळाल्याने भात पिकासारख्या खरीप हंगामावर गुजराण करणे क्र मप्राप्त झाले आहे. आंबोली धरण लघुपाट बंधारे प्रकल्पांतर्गत उजव्या, डाव्या तीर कालव्याचे काम जून २०१५पासून बंद ठेवण्यात आल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या नशिबी प्रतीक्षा आली आहे. खारअंबोली धरणाची साठवणूक क्षमता प्रंचड आहे. कालव्याचे काम पूर्ण झाल्यास ६१६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. विशेष भूसंपादन अधिकारी, रायगड-अलिबाग यांसकडून नोव्हेंबर २००६मध्ये तीर कालव्यासाठी तिसले, जोसरांजण, उंडरगाव, वाणदे, शिघ्रे, तसेच हाफिजखार, आंबोली, गोयगान आदी गावांतील शेतकऱ्यांची १६ एकर ३३ गुंठे जमीन संपादित केली. जमिनीची नुकसानभरपाई म्हणून १ कोटी ६४ लाखांचे वाटप उपविभागीय अधिकारी अलिबाग कार्यालयामार्फत करण्यात आले; परंतु प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सुधारित दराने मोबदला मिळावा, अशी भूमिपुत्रांची मागणी आहे. आंबोली धरणाचा शुभारंभ २००९मध्ये झाला. हे धरण मुरुडसह लगतच्या १२ गावांची जीवनवाहिनी ठरले असून मुबलक पाणीसाठ्यामुळे पर्यटनस्थळी पाण्याची समस्या कायमस्वरूपी मिटली आहे. अंबोली धरण उजव्या तीर कालव्याचे काम ७.१० कि. मी.पैकी ६.१० कि. मी. अपूर्ण असून, डाव्या तीर कालव्याचे २.६४ कि. मी.पैकी १.६४ कि. मी. काम अपूर्ण आहे.कालव्याच्या पाण्याअभावी नारळाची झाडे सुकलीरोहा : रोहा तालुक्यात गेल्या चार वर्षांपासून कालव्याचे पाणी मिळू न शकल्याने ठिकठिकाणी पाणीटंचाई भेडसावत आहे. शेतकऱ्यांनी तयार केलेले कालवेही पाण्याअभावी आटल्याने परिसरातील नारळाच्या बागा सुकल्या आहेत.तालुक्यातील शेतीक्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने सुमारे ४० वर्षांपूर्वी सिंचन काळ प्रकल्पाच्या वतीने डोलवहाळ येथे बंधारा बांधून पाणी अडविण्यात आले. त्या बंधाऱ्याच्या माध्यमातून डावा तीर व उजवा तीर अशी कालव्यांची निर्मिती करून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले गेले. गेल्या ४० वर्षांत कालव्याच्या पाण्यावर ओसाड जमिनीवर शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारची भातशेती केली. कालव्याची निर्मिती केल्यापासून ४० वर्षांच्या कालावधीत ठिकठिकाणी कालव्याला भगदाड पडली आहेत. याशिवाय उंदीर, घुशी व खेकडे यांनीही कालवा पोखरून काढल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होऊ लागला आहे. पर्यायाने मागील काही वर्षांपूर्वी कालव्याची पुनर्निर्मिती व पक्के बांधकाम करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला. परिणामी, सहा वर्षांत कालव्याचे पाणी बंद झाल्यामुळे भातशेती तर ओसाड राहिली, याचबरोबर भातशेतीच्या बांधावर व मोकळ्या रानमाळावर असलेली विविध प्रकारची झाडे, बागायती व नारळाची झाडे सुकू लागली आहेत.