शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल महापालिकेवर महिलांचा हंडामोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 02:14 IST

पनवेल शहरात मागील आठवड्यापासून भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे . दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या नावाखाली केवळ काही मिनिटे शहरात पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी सोमवारी महापालिकेवर धडक हंडामोर्चा काढत आयुक्तांच्या दालनाबाहेर घोषणाबाजी केली.

पनवेल : पनवेल शहरात मागील आठवड्यापासून भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे . दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या नावाखाली केवळ काही मिनिटे शहरात पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी सोमवारी महापालिकेवर धडक हंडामोर्चा काढत आयुक्तांच्या दालनाबाहेर घोषणाबाजी केली.नवी मुंबई महापालिकेने शहराला दिवसाला ५0 टँकर पाणी देण्याचे जाहीर केले आहे. परंतु पनवेल महापालिकेकडे पुरेसे टँकर नसल्याने मिळणारे पाणीही आणता येत नाही. एकूणच पनवेलकरांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात कमालीची कपात करण्यात आली आहे. अत्यंत कमी दाबाने होणाºया पाणीपुरवठ्यामुळे रहिवासी मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या विरोधात नागरिकांत असंतोष पसरत आहे. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी शहरातील पाणीटंचाईला सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप करीत शुक्रवारी पाणीपुरवठा सभापती नीलेश बाविस्कर यांना घेराव घातला होता. या वेळी सत्ताधारी आणि विरोधकांत बाचाबाचीही झाली होती.पनवेल महानगरपालिकेमधील प्रभाग क्र मांक १९मधील रोहिदास वाडा भागात शुक्र वारी मध्यरात्री पाणी आले होते. त्यानंतर सोमवार सकाळी १0 वाजेपर्यंत पाणी न आल्याने संतप्त महिलांनी सोमवारी हंडामोर्चा काढून आपला निषेध नोंदविला. सुरक्षारक्षकांनी महिलांना अडविण्याचा प्रयत्न केला. पनवेल शहरात पाण्याची समस्या गंभीर होत चालली असून, अद्याप कोणत्याच उपायोजना राबविल्या जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतून सिडको, एमजेपी, एमआयडीसी आदी ठिकाणच्या जलवाहिन्या गेलेल्या आहेत. मात्र पनवेल शहराला मुबलक पाणीपुरवठा मिळविण्यास प्रशासणासह सत्ताधाºयांना अपयश आले आहे.

टॅग्स :panvelपनवेल