शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे कॉलनीतील टाकीत महिला पडली

By admin | Updated: April 2, 2016 03:01 IST

जुईनगरमधील रेल्वे कॉलनीतील सांडपाणी साठविण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळून एक महिला २० फूट खोल गटारात पडली. पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सुदैवाने सदर महिलेचा

नवी मुंबई : जुईनगरमधील रेल्वे कॉलनीतील सांडपाणी साठविण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळून एक महिला २० फूट खोल गटारात पडली. पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सुदैवाने सदर महिलेचा व तिच्या मुलीचा जीव वाचला. रेल्वे प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराविषयी नागरिकांनी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रेल्वेने सानपाडा कारशेड सुरू केल्यानंतर येथील कर्मचाऱ्यांसाठी जुईनगर सेक्टर २२ मध्ये वसाहत निर्माण केली. या वसाहतीची प्रचंड दुरवस्था झाली आहे. सकाळी येथील रहिवासी मनीषा टोनी दास व ९ वर्षांची मुलगी त्रिषाला क्लासला सोडण्यासाठी जात होत्या. इमारतीच्या समोरील मलनि:सारण वाहिन्यातील पाणी साठवून ठेवण्याच्या टाकीवरून जात असताना टाकीवरील स्लॅब कोसळला. सदर महिलेने प्रसंगावधान राखून मुलीला बाजूला ढकलले. परंतु ती महिला मात्र टाकीमध्ये पडली. २० फूट उंचीच्या टाकीत पडल्याने पायाचे हाड दोन ठिकाणी मोडले आहे. सुदैवाने सदर महिलेचा जीव वाचला आहे. पाण्यामध्ये पूर्णपणे गेल्या असत्या तर जीव गमवावा लागला असता. नागरिकांनी व काँगे्रसचे ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष निशांत भगत यांनी तत्काळ सदर महिलेला जुईनगरमधील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. सदर महिलेच्या पायावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. या घटनेमुळे रेल्वे कॉलनीमधील नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. येथील काँगे्रस नगरसेविका रूपाली भगत व निशांत भगत यांनी रेल्वे कॉलनीतील या अपघाताविषयी चिंता व्यक्त केली आहे. रेल्वे कॉलनीमधील सांडपाणी येथील सेप्टीक टँकमध्ये साठविले जाते. महापालिकेच्या मलनि:सारण वाहिन्यांशी जोडणी करण्यात आलेली नाही. जवळपास २० फूट खोल सेप्टीक टँकमध्ये पाणी सोडले जाते. या टाकीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीमध्ये असूनही रेल्वे प्रशासनाने दुरुस्ती केली नसल्यामुळे आजचा अपघात झाला आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. (प्रतिनिधी)रेल्वे कॉलनीतील टाकीत महिला पडून गंभीर जखमी झाली आहे. ही महिला व तिची मुलगी सुदैवाने वाचली. रेल्वे कॉलनीतील डागडुजीची कामे महापालिका करत नाही व रेल्वे प्रशासन लक्ष देत नाही. यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेवून जगावे लागत आहे. तत्काळ येतील कामे मार्गी लावली नाहीत तर आंदोलन केले जाईल. - निशांत भगत, अध्यक्ष, युवक काँगे्रस