शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘महिलांनी परिघापलीकडे जाऊन विचार करण्याची गरज’

By admin | Updated: March 9, 2017 02:37 IST

महिला या भावी पिढीच्या प्रतिनिधी आहेत. सामाजिक बदल घडवत असताना त्याची सुरुवात त्यांनी स्वत:पासून करायला हवी. महिलांनी स्वत:भोवती चौकट आखून घेतली आहे.

नवी मुंबई : महिला या भावी पिढीच्या प्रतिनिधी आहेत. सामाजिक बदल घडवत असताना त्याची सुरुवात त्यांनी स्वत:पासून करायला हवी. महिलांनी स्वत:भोवती चौकट आखून घेतली आहे. त्यामुळे महिलांनी परिघापलीकडे जाऊन विचार करण्याची गरज आहे, असे मत सिडको भवन येथे महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शहीद कॅ. विनायक गोरे यांच्या मातोश्री तथा सुप्रसिद्ध साहित्यिका अनुराधा गोरे यांनी व्यक्त केले. सिडको कर्मचारी संघटनेतर्फे महिला दिनानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून अनुराधा गोरे बोलत होत्या.याप्रसंगी सिडकोच्या व्यवस्थापक विद्या तांबवे, पणन व्यवस्थापक मार्गजा किल्लेकर, सिडको कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नीलेश तांडेल, सरचिटणीस जे. टी. पाटील, उपाध्यक्ष नरेंद्र हिरे व वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे उपस्थित होते. आजच्या महिला दिनानिमित्त सर्व महिलावर्गाने नव्या विचारसरणीचा अवलंब केला पाहिजे, असे अनुराधा गोरे या वेळी म्हणाल्या. एक शहीद कॅप्टनची आई असल्याचा मला अभिमान असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. सिडको कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नीलेश तांडेल मनोगत व्यक्त करताना म्हणाले, आज सगळ्याच क्षेत्रात महिला सबला म्हणून कार्यरत आहेत. प्रगल्भ स्त्रीत्वाने जगाचे दायित्व स्वीकारले आहे. स्त्रियांचे कर्तव्य श्रेष्ठत्वाची भूमिका वाखाणण्याजोगी आहे. या कार्यक्रमात महामंडळाच्या विकास कार्यात अमूल्य कामगिरी करणाऱ्या सिडको महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. शैला अ‍ॅन्ड्र्यूज, व्यवस्थापक माहिती तंत्रज्ञान, बिंदू मुरलीधरन, वरिष्ठ परिवहन अभियंता, वैभवी महाकाळकर, सहयोगी नियोजनकार, आरती म्हात्रे, सहायक अभियंता, पूनम कोकस सहायक अभियंता यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिडको कर्मचारी संघटनेच्या सभासद स्नेहल कडू तर आभार प्रदर्शन सुलोचना कडू यांनी केले. या कार्यक्रमाला सिडकोतील वरिष्ठ अधिकारी, अभियंता आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)