शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

वीरोबाचं चांगभलं ... या जयघोषाने दुमदुमले महाड

By admin | Updated: March 12, 2016 02:12 IST

वीरोबाचं चांगभलं.... झोलूबाईचं चांगभलं या जयघोषात ढोलनगाऱ्याच्या निनादात भक्तांचा उत्साह गुरु वारी मध्यरात्री अक्षरश:

महाड : वीरोबाचं चांगभलं.... झोलूबाईचं चांगभलं या जयघोषात ढोलनगाऱ्याच्या निनादात भक्तांचा उत्साह गुरु वारी मध्यरात्री अक्षरश: शिगेला पोहोचल्याचे दिसून आले. लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री वीरेश्वर महाराजांच्या छबिनोत्सवाची शुक्रवारी सकाळी पारंपरिक रूढी-प्रथेप्रमाणे लळिताच्या कीर्तनाने सांगता झाली. संपूर्ण कोकणात लोकप्रिय असलेल्या या छबिना व यात्रोत्सवात इतक्या प्रचंड संख्येने गर्दी होऊनही पोलीस यंत्रणा तसेच वीरेश्वर देवस्थान ट्रस्टच्या नियोजनबद्ध यंत्रणेमुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.गुरुवारी सायंकाळी तालुक्यातील ठिकठिकाणच्या ग्रामदेवतांच्या पालख्या लाडक्या वीरेश्वराच्या भेटीसाठी मंदिर परिसरात दाखल झाल्या. मध्यरात्रीनंतर विन्हेरेच्या झोलाईदेवीच्या पालखीचे आगमन झाले. त्यावेळी तर ढोलताशाच्या तालावर नृत्य करणाऱ्या भक्तांच्या आनंदाला उधाण आल्याचे पाहायला मिळाले. देवीचा गोंधळ विधीही उत्साहात पार पडला. पहाटे साडेचारपर्यंत वीरेश्वर महाराजांची सर्व देवदेवतांच्या पालखीसह मिरवणूक काढण्यात आली. यावेळी परिसरात आकाशाला भिडणाऱ्या सासणकाठ्या खांद्यावर घेऊन ठेक्यात नाचवण्याचा सोहळा तर सर्वांचेच आकर्षण ठरले. या मिरवणुकीत माजी आ. माणिक जगताप, देवस्थानचे सरपंच दिलीप पार्टे, विश्वास अनंत शेठ, रमेश नातेकर, उपनगराध्यक्ष सुदेश कलमकर, दीपक वारंगे आदींसह महाडकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डीवायएसपी प्रांजली सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. (वार्ताहर)