शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर वार

By admin | Updated: December 24, 2016 03:27 IST

पत्नीचे बालपणीच्या मित्रासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून पतीने तिचा गळा चिरून हत्येचा प्रयत्न केल्याची घटना

नवी मुंबई : पत्नीचे बालपणीच्या मित्रासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून पतीने तिचा गळा चिरून हत्येचा प्रयत्न केल्याची घटना नेरूळमध्ये घडली आहे. याप्रकरणी ज्वेलर्स व्यावसायिक पतीला पोलिसांनी अटक केली आहे. पती- पत्नीतील वाद मिटवण्यासाठी नातेवाइकांची बैठक सुरू असताना हा प्रकार घडला.सुधीरकुमार अक्राकरम (४०) असे नेरुळ पोलिसांनी अटक केलेल्या पतीचे नाव आहे. नेरुळ सेक्टर १८ येथील सागरदर्शन सोसायटीत राहणाऱ्या सुधीरकुमारचा सोन्याचा व्यवसाय आहे. त्याचे २००७ साली लग्न झाले असून तीन मुले आहेत. परंतु मागील काही दिवसांपासून त्याचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. पत्नीचे तिच्या बालपणीच्या मित्रासोबत प्रेमसंबंध असल्याचा त्याला संशय होता. यावरून त्यांच्यात सातत्याने वाद होत होते. अखेर दोघांमध्ये घटस्फोट घेण्यापर्यंत प्रकरण पोचले होते. परंतु पती-पत्नीतील वाद मिटून गैरसमज दूर व्हावेत अशी नातेवाइकांची भावना होती. यावरून गुरुवारी दोन्ही कुटुंबातील प्रमुख व्यक्तींची सुधीरकुमारच्याच घरी दिवसभर बैठक सुरू होती. अखेर रात्री चर्चेच्या अंती सुधीरकुमार याने पत्नीला खासगीत बोलण्याच्या बहाण्याने बेडरूममध्ये नेले. तिथे दोघांमध्ये काही वेळ चर्चा देखील झाली. परंतु थोड्या वेळातच सुधीरकुमारच्या पत्नीच्या ओरडण्याचा आवाज येवू लागल्यामुळे घरातल्या व्यक्तींनी तिच्या मदतीसाठी धाव घेतली. यावेळी ती रक्तबंबाळ अवस्थेत बेडरूममध्ये पडलेली होती. सुधीरकुमारने नारळ सोलायच्या धारदार हत्याराने तिच्या डोक्यात व गळ्यावर वार केलेले होते. अखेर उपस्थित नातेवाइकांनी तिला उपचारासाठी नेरूळच्या डी.वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सुधीरकुमार याला अटक केली असून त्याच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)