शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिके वर कोणाचा झेंडा?

By admin | Updated: May 25, 2017 00:29 IST

पनवेल महानगरपालिकेसाठी २४ मे रोजी मतदान पार पडले. या निवडणुकीत देखील ठाकूर विरुद्ध पाटील

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल महानगरपालिकेसाठी २४ मे रोजी मतदान पार पडले. या निवडणुकीत देखील ठाकूर विरुद्ध पाटील असेच युद्ध पाहावयास मिळाले. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील पहिल्या व महाराष्ट्रातील २७ व्या पनवेल महापालिकेवर कोणाची सत्ता येते हे शुक्रवारी २६ मे रोजी ठरणार आहे. पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजपाचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना देखील या निवडणुकीत करो या मरोची स्थिती आहे, तर शेकापला देखील सत्ता मिळवणे गरजेचे आहे. शिवसेनेने देखील भाजपाला साथ न देता वेगळा संसार मांडल्याने साऱ्याच पक्षांनी ही पालिकेची पहिली निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे साऱ्यांचेच पनवेलच्या राजकारणाकडे लक्ष लागून राहिले आहे.पनवेलमध्ये पुन्हा एकदा रामशेठ ठाकूर विरु द्ध विवेक पाटील अशी लढाई पाहावयास मिळत आहे. उमेदवारांच्या सभेत दिग्गजांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या जात होत्या. मतदार कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालणार व कोणत्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागेल हे २६ मे रोजी ठरेल. पनवेलच्या राजकारणात रामशेठ ठाकूर व विवेक पाटील यांचे नाव अग्रस्थानी घ्यावे लागते. पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा -आरपीआय यांची युती, शेकाप-काँग्रेस- राष्ट्रवादी यांची महायुती, तर शिवसेना -स्वाभिमानी यांची युती व मनसे यांच्यात पनवेल महापालिकेसाठी निवडणूक होत आहे. भाजपा-शेकाप व शिवसेना हे पक्ष सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र मतदार कोणाला साथ देतात व कोणाला नाकारतात हे लवकरच समजणार आहे. भाजपा, शेकाप व शिवसेनेने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. पनवेलची निवडणूक ही रामशेठ ठाकूर विरु द्ध विवेक पाटील अशी लढाई आहे. यासाठी शेकाप आघाडीने काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या दिग्गजांना प्रचारासाठी मैदानात आणले होते. तर यावेळी महापालिकेवर सत्ता आली तर पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना मंत्री करणार असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन पनवेलमधील जाहीर सभेत के ले होते. त्यामुळे सर्वच पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. शिवसेनेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सभेसाठी पाचारण करून भगवे वातावरण करण्याचा प्रयत्न केला. तर मनसेने बाळा नांदगावकर व नितीन सरदेसाई यांच्यावर मदार सोपवली होती. त्यामुळे या निवडणुकीत मतदारराजा कोणाला आपला कौल देतो हे येणाऱ्या २६ तारखेलाच स्पष्ट होईल.निवडणुकीच्या कालखंडात काही ठिकाणी गालबोट देखील लागले. काही उमेदवारांवर मारामारीचे तर काहींवर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सत्ता मिळवण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला होता. भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत ठाकूर, शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील व शिवसेनेचे संपर्कप्रमुख आदेश बांदेकर यांनी स्वत: प्रचारात उडी घेतली होती. त्यामुळे या पहिल्या वहिल्या पनवेल महापालिके वर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकतो याची साऱ्यांनाच उत्सुकता लागली आहे.