शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

खांदा वसाहतीतील नालेसफाई कधी?

By admin | Updated: May 31, 2017 06:20 IST

मे महिना संपत आला तरी अद्याप खांदा वसाहतीतील नाले व पावसाळी गटारे सफाईच्या कामांना सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : मे महिना संपत आला तरी अद्याप खांदा वसाहतीतील नाले व पावसाळी गटारे सफाईच्या कामांना सुरुवात झालेली नाही. त्यामुळे यंदा बहुतांश ठिकाणच्या सफाईची कामे कागदावरच राहण्याची भीती निर्माण झाली आहे. यासंदर्भात नवनिर्वाचित नगरसेवक संजय भोपी यांनी सिडको कार्यालयात जावून निवेदन दिले आहे. या मागणीची दखल घेत सिडकोकडून बुधवारी या कामांना सुरुवात करण्याचे आश्वासन देण्यात आले.यंदा मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज वेधशाळेकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे नाले, पावसाळी गटारे यांच्या सफाईची कामे योग्य पद्धतीने पार पाडणे आवश्यक बनले आहे. अन्यथा हे नाले, गटारे तुंबून वसाहतीमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. खांदा वसाहतीत नेमके ही कामे कशामुळे रखडली याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे, खारघर या सिडको वसाहतीत दरवर्षी नाले, गटारे सफाईची पावसाळी कामे ३१ मेपूर्वी पूर्ण केली जातात. आता मे महिना संपत आला, मात्र आजतागायत नालेसफाईच्या कामाला सुरुवात झालेली नाही. खांदा वसाहतीत जवळपास २५ कि.मी पेक्षा जास्त लांबीचे नाले आहेत. रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा निचरा या नाल्यामध्ये होतो. त्याची जोडणी होल्डिंग पाँडला करण्यात आलेली आहे. मात्र नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात माती आणि कचरा जातो त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबते. या व्यतिरिक्त प्लास्टिक जावून अडकत असल्याने पाण्याला अडथळे निर्माण होतो.२६ जुलै २००५ मध्ये नाले तुंबल्यामुळे वसाहतीत पाणी भरले त्यामध्ये मोठी हानी झाली. नालेसफाई झाली नसल्याचे मुख्य कारण पुढे आले तेव्हापासून सिडको दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नाल्यांमध्ये साचलेली माती, गाळ आणि कचरा बाहेर काढते. हे काम स्थानिक मजूर संस्थांना दिले जाते. परंतु या वर्षी खांदावसाहतीत अद्यापही कामाला सुरुवात झालेली नाही. यावर्षी मान्सूनचे लवकर आगमन अपेक्षित आहे. तसा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. असे असताना सिडकोने आपत्ती व्यवस्थापनांतर्गत नालेसफाई करून उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. यासंदर्भात नगरसेवक संजय भोपी यांनी सिडको कार्यालयात जावून पत्र दिले, तसेच अधिकाऱ्यांना वस्तुस्थिती सांगितली. या कामाकरिता ठेकेदार नियुक्त करण्यात आले आहेत. बुधवारपासून कामाला युध्दपातळीवर सुरुवात करून पाऊस सुरू होण्याच्या अगोदर काम पूर्ण करू असे आश्वासन सिडकोकडून भोपी यांना देण्यात आले.