शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षाचे स्वागत जल्लोषात

By admin | Updated: January 1, 2017 03:32 IST

शहरवासीयांनी आज थर्टी फर्स्टचा जल्लोष करीत नववर्षाचे स्वागत केले. हॉटेलिंगपेक्षा अनेकांनी खासगी पार्ट्यांच्या माध्यमातून सेलिब्रेशन करीत मावळत्या वर्षाला निरोप दिला.

नवी मुंबई : शहरवासीयांनी आज थर्टी फर्स्टचा जल्लोष करीत नववर्षाचे स्वागत केले. हॉटेलिंगपेक्षा अनेकांनी खासगी पार्ट्यांच्या माध्यमातून सेलिब्रेशन करीत मावळत्या वर्षाला निरोप दिला. सेलिब्रेशनवर नोटाबंदीचा कोणताही परिणाम जाणवला नाही. असे असले तरी शहरातील हॉटेल्स आणि बीअरबारमधून ग्राहकांची उपस्थिती बेताचीच असल्याचे दिसून आले.नवी मुंबईत खारघर, पनवेलसह जवळपास सहाशे बीअर बार आणि रेस्टॉरंट आहेत, तर जवळपास दहा तारांकित हॉटेल्स आहेत. यात तीन थ्री स्टार आणि दोन फाईव्ह स्टार हॉटेल्सचा समावेश आहे. या सर्व हॉटेल्स व बीअर बारमधून थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात होती. आकर्षक रोषणाईने हॉटेल आणि परिसर उजाळून निघाले होते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या होत्या. काही तारांकित हॉटेल्समध्ये अनलिमिटेड फूड, ड्रिंक त्याचबरोबर डीजे आदी आॅफर जाहीर करण्यात आल्या होत्या. फॅमिली व लहान मुलांसाठी विशेष पॅकेज ठेवण्यात आले होते. अनेक बीअर बारमध्ये थर्टी फर्स्टची विशेष आॅफर म्हणून चकना मोफत देण्याची योजना आखण्यात आली होती. तर काही हॉटेल्स चालकांनी मद्याच्या तीन पेगवर एक पेग फ्रीची योजना जाहीर केली होती. मद्य पिवून वाहने चालवू नयेत, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर तळीरामांच्या सोयीसाठी अनेक हॉटेल्स चालकांनी खासगी वाहन चालक उपलब्ध केले होते. तसेच खासगी टुरिस्ट वाहनांचीही सोय करण्यात आली होती.खासगी पार्ट्यांवर भरविविध प्रकारचे टॅक्स व मद्याच्या वाढलेल्या किमतीमुळे मागील काही वर्षांपासून हॉटेल उद्योगावर मंदीचे सावट आहे. हॉटेलमध्ये जावून दारू पिण्यापेक्षा अनेक जण खासगी पार्ट्या किंवा घरीच एन्जॉय करणे पसंत करतात, तर थर्टी फर्स्टसाठी अनेक जण आपले कुटुंबीय किंवा मित्र मंडळीबरोबर आउटिंगला जाणे पसंत करतात. नेमका याचाच फटका यावेळी हॉटेल इंडस्ट्रीजला बसल्याचे दिसून आले आहे.पोलिसांची नजरथर्टी फर्स्टच्या जल्लोषात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या दृष्टीने पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. शहराच्या विविध भागात जवळपास ११00 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मद्य पिवून वाहने चालविणाऱ्यांवर विशेष लक्ष दिले जात होते. शिवाय उघड्यावर चालणाऱ्या पार्ट्यांवरही निर्बंध घालण्यात आले होते.पहाटे पाच पर्यंत रेलचेलउत्पादन शुल्क विभागाने हॉटेल्सला पहाटे पाच वाजेपर्यंतची वेळ दिली होती. त्यामुळे पोलिसांना पहाटेपर्यंत जागता पाहरा ठेवावा लागला. नाक्या -नाक्यावर बे्रथ अ‍ॅनालायझर मशिनच्या माध्यमातून वाहनचालकांची तपासणी करण्यात येत होती. दारू पिवून वाहने चालवू नये, अशा सूचना केल्या जात होत्या. विशेषत: शहरातील मुख्य अंतर्गत मार्गांसह पामबीच, ठाणे-बेलापूर मार्ग व सायन-पनवेल महामार्गावर विशेष लक्ष ठेवण्यात आले होते.