सूर्यकांत वाघमारे ल्ल नवी मुंबई
आई - वडिलांच्या कुशीत जाते तेच खरे बालपण. परंतु आजही कित्येक अनाथ बालकांच्या नशिबी हे बालपण आलेले नाही. त्यापैकी विकलांग बालकांच्या नशिबी ते येईल की नाही याबाबत शंकाच आहे. आवडीची भाजी निवडल्याप्रमाणो दत्तक घेण्यासाठी मुले निवडली जात असल्याने विकलांग बालके बालआश्रमातच खिळून आहेत.
समाजातील अनेक घटनांमुळे कुटुंबापासून वंचित झालेल्या बालकांना बालआश्रमात ठेवले जाते. त्यापैकी अनेकांच्या नशिबी कौटुंबिक वादातूनच बालआश्रमाचे छत लाभलेले असते. पोलिसांमार्फत कायदेशीर प्रक्रि या पूर्ण करून
चाईल्ड वेल्फेअर कमिटीमार्फत ही मुले बालआश्रमात ठेवली जातात. तेथे या बालकांचे केवळ संगोपन
होत असल्याने त्यांच्या आयुष्यात आई - वडिलांच्या प्रेमाची कमतरता असते. त्यातच जर बालक विकलांग असेल तर त्याला आई - वडिलांची माया मिळणो तितकेच अवघड
आहे. त्यामुळे अशा विशेष
बालकांचे संपूर्ण बालपण हे बालआश्रमातच जाते. जन्मत:च शारीरिक अथवा बौद्धिक वाढीच्या कमतरतेने ही बालके ग्रासलेली असतात.
ठाणो जिल्हय़ात सध्या डोंबिवलीचे जननी आशिष चॅरिटेबल ट्रस्ट आणि नेरूळचे विश्वबालक केंद्र या दोन बालआश्रमांमध्ये विशेष अनाथ बालके वाढत आहेत. नवजात शिशू अवस्थेपासून ते सहा वर्षार्पयतची बालके तेथे ठेवली जातात. सध्या दोनही संस्थांकडे एकूण 14 अनाथ विकलांग बालके आहेत. तेथे त्यांना आवश्यक त्या सुविधा देखील मिळतात. मात्र आई - वडिलांचा मायेचा हआम्हालाही मिळेल मायेचे छत्र?
शासनाच्या पुढाकाराची गरज
विशेष बालकांच्या गरजा सामान्य बालकांपेक्षा वेगळ्या असतात. त्यांना समजून घेणारी व्यक्तीही तितकीच तज्ज्ञ असायला हवी. त्यामुळे विकलांग अनाथ बालकांसाठी कार्य करणा:या समाजसेवी संस्थांचीही कमतरता आहे. त्याकरिता शासनानेच यात पुढाकार घेण्याची गरज आहे.
2 परंतु या विशेष बालकांचे संगोपन करण्यात बालआश्रमांना काही स्तरावर मर्यादा येतात. वयाच्या पाच वर्षापर्यंत बालआश्रमामध्ये या बालकांचे संगोपन केले जाते. मात्र त्यानंतर सहा वर्षावरील विकलांग बालकांचे पुनर्वसन कुठे करायचे, असा प्रश्न संस्थांपुढे आहे. शारीरिक विकलांगत्व असल्याने या बालकांना कोणी दत्तकही घेत नसल्याचे संस्था चालकांचे म्हणणो आहे.
3पाच वर्षावरील विकलांग बालकांच्या संगोपनासाठी ठाणो जिल्हय़ात शासनाची एकही (बालगृह) संस्था नाही. त्यामुळे सहा वर्षावरील बालके देखील बालआश्रमातच ठेवली जात आहेत. वाढत्या वयानुसार त्यांना फिजिओथेरपी, अॅक्युप्रेशर थेरपी, स्पीच थेरपी देणो देखील गरजेचे आहे. अशा सुविधा मिळाल्यास या बालकांमध्ये देखील शारीरिक व बौद्धिक विकास होणो शक्य आहे.